दाऊदच्या खास 'पंटर'ला वाचवण्यासाठी हा देश करतोय आटापीटा

दाऊदच्या खास 'पंटर'ला वाचवण्यासाठी हा देश करतोय आटापीटा

अमेरिकेच्या FBIने गुप्त माहितीच्या आधारे 2018मध्ये त्याला लंडनमधून अटक केली होती. त्याला अमेरिकेच्या हवाली करावं अशी त्यांची मागणी आहे.

  • Share this:

लंडन, 3 जुलै : अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस अशी ओळख असलेला जाबीर मोतीवाला हा सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. जाबिरला आमच्या हवाली करावं अशी मागणी अमेरिकेने केली आहे. तर जाबीर अमेरिकेच्या ताब्यात जाऊ नये यासाठी पाकिस्तान आटापीटा करत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दाऊद आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचं साटंलोटं आहे. जाबीरकडे अतिशय स्फोटक माहिती असून तो अमेरिकेच्या ताब्यात गेल्यास आपलं बींग फुटेल अशी भीती पाकिस्तानला आहे.

दाऊदचा एजंट असलेला जाबीर मोतीवाला हा त्याचा काळा व्यवसाय आणि अनेक कामं बघतो. दाऊदने जगभरातल्या अनेक काळ्या धंद्यात आपला पैसा गुंतवला आहे. ड्रग्ज, मनिलॉड्रींग आणि अनेक गुन्ह्यांची कामं तो करत असतो. अमेरिकेच्या FBIने गुप्त माहितीच्या आधारे 2018मध्ये त्याला लंडनमधून अटक केली होती. त्याला अमेरिकेच्या हवाली करावं अशी त्यांची मागणी आहे.

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

हे प्रकरण वेस्टमिंस्टर कोर्टात असून निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाकिस्तान राजनैतिक पातळीवरही जाबीरला मदत करतोय. जाबीर हा गंभीर आजारी असून त्याला अमेरिकेच्या हवाली केलं जावू नये असा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय.

दाऊदला बंगला सेल्फी पॉईंट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अँटी स्मगलिंग एजन्सी सोमवारी खेडमध्ये दाखल झाली आहे. संध्याकाळपर्यंत मूल्यांकणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खेड येथे दाऊदच्या तीन मालमत्ता आहेत. त्यात एका तीन मजली बंगल्याचा समावेश आहे. 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भिंतींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असे असले तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

विधानसभेसाठी वंचितने काँग्रेसला दिला आघाडीचा फॉर्म्युला, 'इतक्या' जागा लढवणारच!

काही महिन्यांपूर्वी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील नागपाडा विभागात असणार हा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला होता. त्यानंतर आता तस्करी विरोधी संस्थेने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या 14 मालमत्तांची किंमत ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कुख्यात डॉन दाऊदच्या गावातील 14 मालमत्तांवर लवकरच जप्ती येणार आहे.

First published: July 3, 2019, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading