काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकचा कट, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत?

काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकचा कट, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत?

काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पुन्हा कामाला लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटना घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय भारताला पुन्हा पुन्हा युद्धाची धमकी देणाऱ्या पाकच्या माजी सैनिकांनासुद्धा भरती करुण घेण्याचं काम सुरू केलं आहे. पाकिस्तान मोठ्या संख्येनं त्यांच्या सैन्यात माजी सैनिकांची भरती करून घेत आहे.

जामीनावर सुटलेल्या लष्करचा म्होरक्या जकीर उर रहमान लखवीला पाकव्याप्त काश्मीमध्ये दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाठवलं आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या लखवीने अबू बक्रच्या साथीनं गेल्या आठवड्यात पाकव्याप्त काश्मीमध्ये एक बैठकही घेतल्याचं समजते. यामध्ये जवळपास 40 ते 50 दहशतवादी उपस्थित होते. त्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये 6-7 दहशतवाद्यांच्या गटानं घुसखोरी करावी असं सांगण्यात आलं आहे. कारण भारतीय सैन्यानं एका ठिकाणी त्यांना रोखलं तर दुसऱ्या ठिकाणाहून सीमा पार करता येईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी वेगवान हालचाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घुसखोरीसाठी अशी ठिकाणं निवडण्यात आली आहेत जिथं पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. यामुळे घुसखोरी सहज करता येईल असा दहशवाद्यांचा अंदाज आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना लॉन्च पॅडपासून दुसऱ्या ठिकाणी हलवलं होतं. मात्र आात पुन्हा दहशतवादी लॉन्च पॅडवर आले आहे. वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 300 पेक्षा जास्त दहशतवादी पाकव्याप्त तौबत, सरदारी, लीपा आणि जमुआ सेक्टरमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading