या EXCLUSIVE फोटोंमधून उघड होतेय पाकिस्तानची चाल; अशी करतायत नव्या हल्ल्याची तयारी

या EXCLUSIVE फोटोंमधून उघड होतेय पाकिस्तानची चाल; अशी करतायत नव्या हल्ल्याची तयारी

News18 ला मिळालेल्या या Exclusive फोटोमधून पाकिस्तानची नवी चाल काय असेल याचा अंदाज येऊ शकतो. भारतीय सुरक्षा दलं पाकच्या या हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : पुलवामा Pulwama स्फोट घडवल्यानंतर भारताने केलेल्या Airstrike मध्ये पाकिस्तानाले Pakistan दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. या तळांवर ISI पुरस्कृत माणसं दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत होते, अशी माहिती भारतीय सूत्रांनी दिली. हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले खरे, पण आता पाकिस्तान दहशतवादी ट्रेनिंगसाठी नवा डाव खेळत आहे आणि तो उघड होतोय या फोटोमधून. News18 ला मिळालेल्या या Exclusive फोटोमधून पाकिस्तानची नवी चाल काय असेल याचा अंदाज येऊ शकतो. पाकव्याप्त काश्मीरमध्ये रावलकोटच्या जंगलातला हा फोटो आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घुसखोरीचा डाव

पाकव्याप्त काश्मीरमधला हा फोटो अतिरेक्यांच्या मोबाईल कँपचा आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम या असा कँपवर सुरू आहे. या प्रशिक्षित अतिरेक्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच सीमेपार भारतात घुसवण्याची तयारी पाकिस्तानने चालवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाहा VIDEO : या गायिकेने मोदींना दिली Snake Attack ची धमकी

भारतीय सुरक्षा दलं पाकच्या या हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहे.

'जमात'च्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण

जैश ए मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या संघटनांमध्ये कार्यरत अतिरेक्यांना एकत्रित प्रशिक्षण अशा मोबाईल कँपमधून देण्यात येत आहे.

मोठी बातमी : जम्बो दंड भरण्यातून वाहनधारकांना मोठा दिलासा, रावतेंनी केली 'ही' घोषणा

जमात- ए- इस्लामी ही संघटना या प्रशिक्षण तळांचं नेतृत्त्व करत आहे.

सीमेवर पाकिस्तानची जमवाजमव

एकीकडे अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोबाईल कँप सुरू आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानने सीमेजवळच्या हालचाली वाढवल्या आहेत आणि अधिकचे जवान तैनात केले आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पूँछ आणि दुसरीकडे बाग आणि कोटली सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांची पूर्ण ब्रिगेड तैनात आहे. LoC वर आपली पकड घट्ट करण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. 2000 हून जास्त सैनिक सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत.

हे वाचा  - गणपती बसवण्यासाठी घरातून पळाली 2 मुस्लीम मुलं

रावळकोटच्या जंगलातले हे फोटो पाकिस्तानचा डाव उघडा पाडतात. अतिरेक्यांच्या नावाखाली भारतावर हल्ला करण्याचा या देशाचा बेत असू शकतो. पण भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलं या हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहेत आणि कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची भारतीय सैनिकांची तयारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 06:41 PM IST

ताज्या बातम्या