मराठी बातम्या /बातम्या /देश /

मसूद अझहरच्या मृत्यूची अद्याप घोषणा नाही; पाक माध्यमांनी व्यक्त केला संशय

मसूद अझहरच्या मृत्यूची अद्याप घोषणा नाही; पाक माध्यमांनी व्यक्त केला संशय

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूच्या बातमीला अजूनही पाकिस्तानी सरकारने दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी सुरुवातीला मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी संदिग्धपणे दिली पण आता पाकिस्तानी माध्यमंसुद्धा या बातमीबाबत संशय व्यक्त करत आहेत.

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूच्या बातमीला अजूनही पाकिस्तानी सरकारने दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी सुरुवातीला मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी संदिग्धपणे दिली पण आता पाकिस्तानी माध्यमंसुद्धा या बातमीबाबत संशय व्यक्त करत आहेत.

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूच्या बातमीला अजूनही पाकिस्तानी सरकारने दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी सुरुवातीला मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी संदिग्धपणे दिली पण आता पाकिस्तानी माध्यमंसुद्धा या बातमीबाबत संशय व्यक्त करत आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 3 मार्च : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूच्या बातमीला अजूनही पाकिस्तानी सरकारने दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी सुरुवातीला मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी संदिग्धपणे दिली पण आता पाकिस्तानी माध्यमंसुद्धा या बातमीबाबत संशय व्यक्त करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अझहर इस्लामाबादच्या एका रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होता. तिथेच 2 मार्चला त्याचा मृत्यू झाला. पण या  बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाले नाही.

दोन दिवसांपूर्वीच CNN ला दिलेल्या मुलाखतीत मौलाना मसूद अझहर पाकिस्तानातच असल्याचं त्यांचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी मान्य केलं होतं. आतासुद्धा अझहरबद्दल पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मसूद अझहर खूप आजारी आहे, एवढीच माझ्याजवळ माहिती आहे."

जिओ टीव्ही या पाकिस्तानी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबीयांकडूनही त्याच्या मृत्यू्च्या वार्तेला दुजोरा मिळालेला नाही. भारतीय संरक्षण विश्लेषकांच्या मतानुसार, मौलाना मसूद अझहरचा मृत्यू झाला तरी पाकिस्तान ते तातडीने जाहीर करणं अवघड आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत पाकिस्तान आपल्याला जैश ए मोहम्मदच्या या म्होरक्याचा ठावठिकाणा माहिती नाही, अशाच पवित्र्यात होता.

भारताने मात्र मसूद पाकिस्तानातच असल्याचा दावा पहिल्यापासून केलेला होता आणि त्यानुसार जैश ए मोहम्मदच्या तळांना लक्ष्यही केलं.

संसद हल्ला ते पुलावामा : क्रूरकर्मा मसूद अझहरच्या 'जैश'ने गेली 21 वर्षं असा घातला होता हैदोस

Most Wanted Terrorist 20 वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेनंतर भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता मसूर अझहर

कोण आहे मसूद अझहर?

संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झाला. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. संघटनेने जारी केलेल्या एका व्हिडीओनुसार आदिल अहमद उर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. आदिल पुलवामा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

कंदहार विमान अपहरणानंतर जैश-ए-मोहम्मदला बळ

सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्या आयईडीने उड़वून देणाऱ्या या संघटनेचा हा पहिलाच हल्ला नाही. 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.

मसूद अजहरच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण

भारतातील तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद या दहशतवादी आणि म्होरक्यांच्या सुटकेची मागणी करत विमानाचे अपहरण केलं होतं. अपहृत विमानात 168 प्रवासी होते. त्यांच्यासह विमान कंदहारला नेण्यात आलं होतं. शेवटी सहा दिवसांनी देशभरातून दबाव वाढू लागल्याने तत्कालिन भाजप सरकारने तिघांना तुरुंगातून मोकळं करत ओलीस ठेवण्यात आलेल्यांची भारतीय नागरिकांची सुटका करुन घेतली होती.

भारतात दहशतवादी हल्ले

2000 मध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि मसूद अजहरने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. यावेळी इतर काही संघटनामधील दहशतवादी जैशमध्ये सहभागी झाले. स्थापनेनंतर दोन महिन्यात जैश-ए-मोहम्मदने श्रीनगरमधील बदामीबाग येथे लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला केला होता. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमधील सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला केला होता.

पुलवामाप्रमाणेच श्रीनगरमध्ये हल्ला

ज्याप्रमाणे पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या गाडीला धडकवली त्याच पद्धतीने 24 सप्टेंबर 2001 ला श्रीनगरमध्ये विधानसभा भवनात गाडी घुसवली होती. यात 38 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

संसदेवर आणि पठाणकोट हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद?

भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 ला झालेला हल्ला आणि दोन वर्षांपूर्वी 2016 ला पठाणकोट येथे हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटनाच जबाबदार असल्याचे म्हटले जाते. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू हा जैश संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी होता. त्याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली. उरी येथे 2016 मध्ये भारताच्या लष्करी ठाण्यांवर झालेल्या हल्ल्याला जैशला जबाबदार धरलं जातं. या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

भारतासह संयुक्त राष्ट्रसंघानेही घातली आहे बंदी

जैश ए मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलं आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने 2002 मध्ये त्यांच्यावर बंदी घातली होती. मात्र तरीही संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहत असल्याचंही बोललं जातं. अजहर मसूदचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. पण सबळ पुरावे नसल्याचे कारण देत पाकिस्तानने मसूदच्या प्रत्यार्पणाला नकार दिला आहे.

First published:

Tags: Pakistan, Terrorism