'2025 नंतर भारताचा एक भाग असेल पाकिस्तान'

'2025 नंतर भारताचा एक भाग असेल पाकिस्तान'

'तुम्ही लिहून ठेवा पुढच्या 5-7 वर्षात तुम्हाला पाकिस्तानात घर घेता य़ेईल'

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी पाकिस्तान 2025 नंतर भारताचा भाग असेल असं म्हटलं आहे. एका सभेत ते काश्मीरी आणि त्यांची पुढची वाटचाल या विषयावर बोलत होते. इंद्रेश कुमार यांनी दावा केला की, तुम्ही लिहून ठेवा पुढच्या 5 ते 7 वर्षात तुम्हाला कराची, लाहोर, रावळपिंडी आणि सियालकोट या ठिकाणी घर खरेदी करता येईल. त्याचसोबत तिथं व्यवसायदेखील करता येईल असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटले.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. 1945 पूर्वी तो हिंदुस्थान होता आता पुन्हा 2025 नंतर तो हिंदुस्थान होणार असल्याचे इंद्रेश कुमार म्हणाले. एका अशा अखंड भारताची योजना जिथं युरोपी युनियन प्रमाणे देशांमध्ये कोणतीही सीमा नसेल असे सांगत बांगलादेशचे सरकारही यासाठी तयार होते असा दावा इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

भारत सरकारने पहिल्यांदा काश्मीरबाबत कठोर भूमिका घेतली आहे. लष्कर राजकीय इच्छाशक्तीवर काम करते. आता राजकीय इच्छाीशक्ती बदलली आहे. यामुळे आपल्याला लाहोरमध्ये व्यवसाय करता येईल हे स्वप्न खरे होईल. कैलास, मानसरोवरसाठी चीनची परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. युरोपियन युनियन प्रमाणे युनियन ऑफ अखंड भारत होण्याच्या मार्गाने वाटचाल होऊ शकते.

पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी इंद्रेश कुमार यांनी केले. ते म्हणाले की सैनिकांचे कौतुक करता करता पुरावे मागतात आणि मोदींचा विरोध करता करता पाकिस्तानवर प्रेम असल्याचे म्हणतातय असे लोक 'जेएनयू'त शिकू देत नाहीतर महाराष्ट्रात, देशात नवीन कायदा आणायचा आहे. तेव्हा ना नसरुद्दीन चालेल ना नवज्योत सिंग सिद्धू चालेल असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं.

आरएसएस नेत्याने म्हटले की चीन पाकिस्तानला का मदत करत आहे ते माहिती आहे. पाकिस्तानला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी चीन तसं करत आहे. कोणत्याही लढाईशिवाय चीनला हरवल्याने आता या कुरापती सुरू आहेत. डोकलाममधून त्यांना हाकलले याचा राग त्यांना आहे असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटले.

SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?

First published: March 17, 2019, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading