Airstrike नंतरही बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग, 27 जण भारतावर हल्ल्याच्या तयारीत

Airstrike नंतरही बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग, 27 जण भारतावर हल्ल्याच्या तयारीत

जैश चा मोऱ्हक्या मौलाना मसुद अजहर याचा पुतण्या युसूफ अजहर हा ट्रेनिंग कॅम्प सांभाळत असून त्यानेच 27 दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलंय.

  • Share this:

नवी दिल्ली 7 फेब्रुवारी : पाकिस्तानमधल्या बालाकोट इथं असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण होतंय. भारताच्या हवाई दलाने इथले दहशतवादी तळ हवाई हल्ले करून उद्धवस्त केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एक धक्कादायक माहिती पुढे आलीय. या तळांवर 27 दहशतवाद्यांचा एक ग्रुप प्रशिक्षण घेऊन तयार असून तो भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणू शकतो अशी शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय. या तळांवर होत असलेल्या हालचालींची माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडे असून कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

वर्षभरापूर्वी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट असून तिथल्या पर्वतांवर जैश ए मोहम्मद तर्फे हे प्रशिक्षणतळ चालवले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने धाडसी कारवाई करत हे तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

'दहशतवाद्यांना बिर्यानी'च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री योगी अडचणीत

या कारवाईनंतर काही महिने शांत राहिल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा हे तळ सुरू केल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांकडे होती. जैश चा मोऱ्हक्या मौलाना मसुद अजहर याचा पुतण्या युसूफ अजहर हा हे ट्रेनिंग कॅम्प सांभाळत असून त्यानेच 27 दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलंय.

मुलींचे कपडे घालून फिरत होते तरुण, खऱ्या तृतीयपंथीयाने मग भररस्त्यावर काढले कपडे

पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानमधलेही दहशतवादी यात सहभागी आहेत. त्यांना छुप्या पद्धतीने करावयाचे हल्ले आणि दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देण्यात आलंय. पाकिस्तानी लष्कराचं या दहशतवादी गटांना संरक्षण असून त्यांच्याकडूनही त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचीही माहिती आहे.

First published: February 7, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या