BREAKING NEWS : पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला

BREAKING NEWS : पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला

पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आहे. बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले.

  • Share this:

इस्लामाबाद, 11 मे : पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आहे. बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. या हॉटेलमध्ये 3 अतिरेकी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे. हे अतिरेकी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे. पर्ल काॅन्टिनेन्टल या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा हल्ला झाला. सशस्त्र अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार सुरू केला.

श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हल्ला

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात फाइव्ह स्टार हॉटेलना लक्ष्य करण्यात आलं होतं. पाकिस्तानमधल्या या हल्ल्यातही अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमाराला काही अतिरेकी हॉटेलमध्ये घुसल्याची बातमी आली. यानंतर विशेष सुरक्षा यंत्रणांनी या हॉटेलमध्ये कारवाई सुरू केली. सुरक्षा यंत्रणांनी पर्ल काॅन्टिनेन्टल हे हॉटेल रिकामं केल्यामुळे अनेक जणांना बाहेर काढण्यात यश आलं. यावेळी हॉटेलमध्ये कुणीही परदेशी नागरिक नव्हते, असं पोलिसांनी सांगितलं.

याआधीच्या हल्ल्यात 14 जण ठार

पाकिस्तानमधल्या ग्वादरमध्येच झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसह 14 जण मारले गेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच हा हल्ला झाला.

याच ग्वादर बंदराच्या विकासासाठी चीन पाकिस्ताला मदत करत आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading