काश्मिरात दहशतवाद्यांसाठी आकाशातून येत आहेत शस्त्र, पाकिस्तानचा डाव उधळला

काश्मिरात दहशतवाद्यांसाठी आकाशातून येत आहेत शस्त्र, पाकिस्तानचा डाव उधळला

पाकिस्तानचे हे प्रयत्न उधळून लावू असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एन एस जामवाल यांनी दिला आहे.

  • Share this:

श्रीनगर 20 सप्टेंबर: सर्जिकल स्ट्राईक आणि बालकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानची खोड जिरलेली नाही. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं आणि भारतात त्यांची घुसखोरी करणे अजुनही पाकिस्तानने सुरूच ठेवले आहेत. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ सक्रिय झाले असून दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. पाकिस्तानचे हे प्रयत्न उधळून लावू असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एन एस जामवाल यांनी दिला आहे.

पाकिस्तानातून ‘ड्रोन’व्दारे सीमेजवळच्या भागात शस्त्र टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांसाठी ही शस्त्रे ठराविक भागात टाकली जातात. या ड्रोन्सचा छडा लावणं हे सुरक्षा दलांसाठी मोठं आव्हान झालं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानचे हे दृष्ट प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलं सर्व प्रयत्न करत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून दोन दिवसांपूर्वी लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात 2 एके-56 रायफल्स, 180 राउंड, 6 एके-मॅगझीन्स, दोन चिनी पिस्तुल, 30 राउंडसोबतच तीन पिस्तुल मॅगझीन्स आणि चार ग्रेनेड एवढा शस्त्रसाठा आहे. त्याच्यासोबतच 1 लाख रुपये रोखही जप्त करण्यात आली आहे.

हिवाळ्याच्या आधी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसविण्याचाही पाकिस्तानचा डाव आहे. सुरक्षा दलांना नुकताच पाकिस्तानने सीमेवर खोदलेला एक बोगदाही आढळला होता. चिनी इंजिनिअर्सच्या मदतीने हा बोगदा खणण्यात आल्याचं उघड झालं होतं.

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक, 24 तासांत 94 हजार जणांना डिस्चार्ज

दहशतवाद्यांना भारतात पाठविण्यासाठी आणि त्यांना पुन्हा परत पळून जाण्यासाठी या बोगद्याचा उपयोग करण्याचा डाव उघडकीस आला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 20, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या