Pulwama Attack : पाकचा खोटारडेपणा, भारताने दिलेल्या पुराव्यांबद्दल म्हटले...

भारताने पाकिस्तानला 22 दहशतवादी तळांची यादी पुराव्यांसह दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 01:18 PM IST

Pulwama Attack : पाकचा खोटारडेपणा, भारताने दिलेल्या पुराव्यांबद्दल म्हटले...

नवी दिल्ली, 28 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल पाकिस्तानचा नवा खोटारडेपणा समोर आला आहे. पाकिस्ताननं म्हटलं की, पुलवामा हल्ल्यात त्यांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच भारताने ज्या 22 जागांबद्दल सांगितले त्या ठिकाणी कोणताही दहशतवादी तळ आढळला पाकिस्तानने म्हटले आहे.

भारताला जर या ठिकाणी पाहणी करायची असेल तर पाकिस्तान यासाठी परवानगी देण्यास तयार असल्याचेही पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी 54 जणांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यापुढे जी माहिती मिळेल ती भारताला देण्यात येईल असंही पाकिस्ताननं म्हटलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, भारताने दिलेल्या पुराव्याने पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध सिद्ध होत नाही. भारताकडे आणखी काही पुरावे असतील तर द्यावेत. त्याबद्दल चौकशी करून कारवाई करण्यास पाकिस्तान तयार आहे.

दरम्यान, भारताने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 27 फेब्रुवारीला पुलावामा हल्ल्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली होती. भारताने यामध्ये हल्ल्याशी जैश ए मोहम्मदचा संबंध असल्याचे पुरावे दिले होते. त्यानंतर पाकिस्तानात जैशचे तळ आणि त्यांच्या म्होरक्याच्या वास्तव्याचे पुरावेही भारताने दिले होते.

जम्मू काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतप भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैशचे तळ उद्ध्वस्त केले होते.

Loading...

VIDEO : सगळ्यांचा हिशेब मांडला जाईल PM मोदी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...