पाकिस्तानची ऑफर; ‘भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी’

पाकिस्तानची ऑफर; ‘भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी’

पाकिस्ताननं आता बालाकोटला भेट द्या अशी ऑफर भारतीय मीडियाला दिली आहे.

  • Share this:

कराची, 29 एप्रिल : एअर स्ट्राईक करत भारतीय वायु दलानं बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. पण, भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये काहीही नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. शिवाय, भारत खोटं बोलत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. पण, खोटारड्या पाकिस्ताननं एअर स्ट्राईकच्या तब्बल दोन महिन्यानंतर एअर स्ट्राईकमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शहानिशा करण्यासाठी भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी. आम्ही त्यांचं स्वागत करू अशी ऑफर दिली आहे. इच्छा असल्यास भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यावी असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल हसीफ गफूर यांनी ही ऑफर भारतीय मीडियाला दिली आहे. यावेळी त्यांनी भारत खोटं बोलत असल्याचा बिन बुडाचा आरोप देखील केला.

आता अरविंद केजरीवालाच्या पत्नीवर ‘गंभीर’ आरोप

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर बाराव्या दिवशी भारतानं एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या हद्दीत घुसत एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

सनी देओलवर तब्बल 53 कोटींचं कर्ज; तर संपत्ती...

पाक दहशतवादाचं माहेरघर

पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसत असल्याचं भारतानं वेळोवेळी जगासमोर सांगितलं. पण, पाकिस्ताननं कायम भारताचा दावा फेटाळून लावला. आता मात्र पाकिस्ताननं होय आमच्या भूमित दहशतवाद आहे असं मान्य केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. यापूर्वी दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्ताननं कायम हात वर केले आहेत. भारतानं या दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आवाज उठवला आहे. त्याला अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं देखील पाठिंबा दिला आहे.

VIDEO : मुंबईत बिग बाजारची आग पुन्हा भडकली

First published: April 29, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading