• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पाकिस्तानमधल्या 'वजनदार' माणसाचा मृत्यू, शस्त्रक्रियेसाठी भिंत फोडून आणलं बाहेर

पाकिस्तानमधल्या 'वजनदार' माणसाचा मृत्यू, शस्त्रक्रियेसाठी भिंत फोडून आणलं बाहेर

नुरुल हसन हे एवढे लठ्ठ होते की शस्त्रक्रियेसाठी त्यांना घराबाहेर काढणंही अशक्य होतं. घराच्या मुख्य दरवाजातून ते बाहेरही येऊ शकत नव्हते. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी घराची भिंत फोडावी लागली.

 • Share this:
  लाहोर, 8 जुलै : पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या नुरूल हसन नावाच्या एका जाड्या माणसाचा मृत्यू ओढवला. 330 किलो वजनाचे नुरूल हसन हे 55 वर्षांचे होते. ते पाकिस्तानमधल्या सादिकाबादमध्ये राहत होते. नुरूल हसन यांच्यावर नुकतीच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेसाठी 28 जूनला ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना लाहोरमध्ये नेण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या आदेशावरूनच त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं होतं पण शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मृत्यू ओढवला. अतिदक्षता विभागात मृत्यू वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर नुरूल हसन यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. त्यांना तिथे देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण हसन आणि आणखी एका रुग्णाचा अतिदक्षता विभागातल्या गोंधळामुळे मृत्यू ओढवला. हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी नुरूल यांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू ओढवला. अतिदक्षता विभागात एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. त्यांनी तिथल्या खिडकीच्या काचा फोडल्या. या हिंसाचारातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी सगळ्यांचीच पळापळ झाली. यामध्ये नुरूल यांचा हकनाक बळी गेला.

  राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

  नुरुल हसन हे एवढे जाडे होते की शस्त्रक्रियेसाठी त्यांना घराबाहेर काढणंही अशक्य होतं. घराच्या मुख्य दरवाजातून ते बाहेरही येऊ शकत नव्हते. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी घराची भिंत फोडावी लागली होती. याआधी 2017 मध्ये पाकिस्तानमधल्या अशाच जाड्या व्यक्तीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांचं वजन 360 किलोवरून 200 किलोवर आणण्यात आलं होतं. पाकिस्तानमध्ये जास्त वजन असणाऱ्यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 29 टक्के आहे. त्यातही 51 टक्के लोक हे अतिलठ्ठ आहेत. ============================================================================================================== VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा
  Published by:Arti Kulkarni
  First published: