पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, तेल कंपन्यांच्या प्रमुखांची बोलवली बैठक!

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, तेल कंपन्यांच्या प्रमुखांची बोलवली बैठक!

पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद 27 फेब्रुवारी : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानात सरकारविरोधात निर्माण झालेला क्षोभ कमी करण्यासाठी पाकिस्तानानी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर काय करता येईल यासाठी पाकिस्तानने देशातल्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्याला सुरूवात केली आहे.


पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर तेलाचे किती साठे उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.


भारता आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भारताकडून हल्ल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लष्कराला पेर्ट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कायम राहावा यासाठी काय करता येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

Loading...


दरम्यान, पाकिस्तानच्या तिरोजीत खडखडाट असून फक्त 60 दिवस पुरेल एवढाच विदेशी चलनाचा साठा आहे. तेल आणि तातडीच्या शस्त्र खरेदीसाठी पैसे कसे जमवायचे याचा मोठा प्रश्न पाकिस्तानपुढे आहे.


सीमेवर गोळीबार


गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...