News18 Lokmat

पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी

प्रेयसीला त्याला भेटता आलं नाही. मत्र त्या आधीच पाकिस्तानी पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी त्याला बेकायदा प्रवेश केल्याच्या आरोपावरुन अटक केली.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 07:20 PM IST

पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी

अमृतसर,18 डिसेंबर : फेसबुकच्या माध्यमातून तो पाकिस्तानी युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्या भेटीसाठी तो पाकिस्तानात पोहोचतो. तिची तर भेट होत नाहीच मात्र त्याला पाकिस्तानच्या तुरुंगात सहा वर्ष खितपत काढावी लागली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे मुंबईतल्या एक तरुणाची. हामिद निहाल अन्सारी असं त्याचं नाव आहे. हामिदची मंगळवारी पेशावरच्या तुरुंगातून सुटका झाली आणि तो भारतात परत आला.


हामिद या मुंबईत वर्सोव्यात राहणाऱ्या तरुणाची फेसबुकवरुन एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्या तरुणीच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या हमिदने तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.


पाकिस्तानात थेट जाणं शक्य नसल्यानं तो 2012मध्ये अफगाणिस्तान मार्गे पकिस्तानात पोहोचला. मात्र त्याला आपल्या प्रेयसीला भेटता आलं नाही. त्या आधीच पाकिस्तानी पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी त्याला बेकायदा प्रवेश केल्याच्या आरोपावरुन अटक केली. तो गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याची रवानगी पेशावरच्या तुरुंगात झाली.

Loading...
 


तेव्हापासून गेली सहा वर्ष मुंबईतले त्याचे नातेवाईक हामिदच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. कोर्टाबाजीनंतर पेशावरमधल्या कोर्टानेही त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांनी हामिदच्या कुटुंबीयांना मदत केली.


हामिदच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेऊन त्यांना प्रकरण समजावून सांगितंल. शेवटी मंगळवारी 18 डिसेंबरला त्याची सुटका झाली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला पंजाबमधल्या वाघा सीमेवर आणून सोडलं.

भारतात प्रवेश करताच हामिद भाऊक झाला. खाली वाकून त्याने जमीनीचं चुंबन घेतलं. यावेळी  त्याची आई आणि इतर कुटुंबीय हजर होतो. हामिद बुधवारी मुंबईत येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...