Home /News /national /

जगाला कळलं मोस्ट वॉन्टेड दाऊद कुठे राहातो पण पाकिस्तान म्हणालं...

जगाला कळलं मोस्ट वॉन्टेड दाऊद कुठे राहातो पण पाकिस्तान म्हणालं...

मोस्ट वॉन्टेड दाऊदवरून पाकिस्तानचा पुन्हा यु-टर्न

    इस्लामाबाद 23 ऑगस्ट: भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमवरून पाकिस्ताननं आता मोठा यु-टर्न घेतला आहे. दाऊद कराचीमध्ये राहात असून त्याच्या 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असल्याच्या भारताच्या दाव्याला पाककडून शनिवारी दुजोरा देण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्ताननं आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिम कराचीमध्ये नसल्याची माहिती आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीचा पुन्हा खंडन करत यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटलं आहे की दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा खोटा आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही. हे वाचा-चिनी खेळण्यांचे दिवस संपले, आता पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा दहशतवादांना मदत करणाऱ्या देशांवर FATF ही आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेवत असते. त्या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पत खालावली होती. जागतिक वित्तीय संस्था मदतही करत नव्हत्या. त्यामुळे त्या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला ही कृती करावी लागली. या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र हे सर्व दावे पाकिस्तानं फेटाळून लावत आपल्या भूमिकेपासून युटर्न घेतला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Dawood ibrahim, Pakistan

    पुढील बातम्या