मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत घालायला पाक तयार, पण घातली 'ही' अट

मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत घालायला पाक तयार, पण घातली 'ही' अट

पुलवामासंदर्भात एक नवी अट घालून पाकिस्तानने नवी चाल खेळली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : जैश ए मोहम्मदचा प्रमुख आणि क्रूरकर्मा मसूद अझहरचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकायची मागणी भारत गेली अनेक वर्षं करत आहे. पाकिस्तानने त्याला प्रथमच सशर्त तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

भारताने पुलवामा हल्ल्यांचा पुरावा द्यायला हवा, तरच मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत टाकण्याबद्दल आम्ही काही बोलू शकतो, असं फैसल म्हणाले. पाकिस्तानी टीव्ही शो इस्लामाबाद व्ह्यूजमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. "पुलवामा हल्ला हा वेगळा विषय आहे. भारताने जम्मू- काश्मीरमध्ये सुरू असलेली चळवळ दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे, हे पाकिस्तानने वारंवार सांगितलं आहे", असंही फैसल म्हणाले.

मुख्याध्यापकाचा मुलगा ते जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

संसद हल्ला ते पुलावामा : क्रूरकर्मा मसूद अझहरच्या 'जैश'ने गेली 21 वर्षं असा घातला होता हैदोस

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती. तरीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही भूमिका मांडली आहे की, पुलवामाचा संबंध अझहर मसूदशी लावू नये, तरच आम्ही त्याचं नाव काळ्या यादीत टाकायच्या गोष्टीवर चर्चा करू. पुलवामा हल्ल्याशी मसूदचा संबंध आहे, असं भारताला वाटत असेल तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत, असं या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

मौलाना मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये काळ्या यादीत टाकावं यासाठी भारताने दबाव वाढवला आहे. पाकिस्तानची बाजू घेत चीनने याबाबत आतापर्यंत मोडता घातला आहे. मागच्या महिन्यात चीनने काही तांत्रिक कारणासाठी मसूद अझहरवर बंदी घालायचा प्रस्ताव रोखून धरला. अशा प्रकारे हा प्रस्ताव चौथ्यांदा चीनमुळे मागे पडला आहे.

चीनने पुन्हा घातला खोडा, मसूद अझहर जागतिक दहशतवादी नाही

Most Wanted Terrorist 20 वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेनंतर भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता मसूर अझहर

मसूद अझहरवर बंदी घालावी यासाठी काही दिवसांपूर्वी ब्रिटनकडूनही दबाव वाढला होता. UN सिक्युरिटी कौन्सिलमध्ये मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत घालण्यात यावं यासाठीचा ताजा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन या देशांकडून आला होता आणि भारतातल्या काश्मीर खोऱ्यात पुलामावामध्ये जैश ए मोहम्मदने घडवलेल्या हल्ल्याचा त्याला संदर्भ होता. या हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते.

First published: April 29, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading