मराठी बातम्या /बातम्या /देश /

काश्मीर दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, PM इम्रान खान यांचे मात्र मौन

काश्मीर दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, PM इम्रान खान यांचे मात्र मौन

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

नवी दिल्ली, 15, फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ९ तासानंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. हा दहशतवादी हल्ला गंभीर असल्याचं पाकिस्तान सरकारने म्हटलं आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुलवामातील अवंतिपुरा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवली. यामध्ये 44 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नेहमी ट्विटरव अॅक्टिव्ह असतात. मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर त्यांनी मौन बाळगलं आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अनेकदा भारतीय माध्यमांना सल्ले दिले होते. पण यावेळी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असताना इम्रान खान यांनी तोंडावर बोट ठेवलं आहे.

पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, आमच्या देशाने जगातील कोणत्याही ठिकाणी हिंसा करणाऱ्या घटनांचा विरोध केला आहे. आम्ही कोणत्याही हल्ल्याचा विनाचौकशी पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या भारतीय माध्यमे आणि सरकारच्या आरोपांना फेटाळून लावतो असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला धारेवर धरत शेजारी देशाने दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करावं आणि त्यांच्या देशातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हसिना यांनी आम्ही भारताच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.

जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदने केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 44 जवानांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्यांना धडकवली. गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

VIDEO : दहशतवाद्यांनी असा घडवून आणला Pulwama Terror Attack

First published:

Tags: CRPF jawan, Kashmir, Pulwama, Terror attack