परराष्ट्र सचिव गोखलेंच्या पत्रकार परिषदेनंतर पाकची पहिली प्रतिक्रिया

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 01:24 PM IST

परराष्ट्र सचिव गोखलेंच्या पत्रकार परिषदेनंतर पाकची पहिली प्रतिक्रिया

इस्लामाबाद, 26 फेब्रुवारी : परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी एअर स्ट्राईकनंतर पत्रकार परिषद घेत भारतानं केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आम्हालाही स्वसंरक्षण, प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. भारताच्या हल्ल्याला आम्ही देखील प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमुद कुरेशी यांनी दिली. यावेळी पाकिस्तानच्या संसदेमध्ये 'इम्रान खान शेम शेम' अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ उध्वस्त केला अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे मोठं नुकसान झाले आहे. जैश कडून दहशतवादी कारावाया सुरूच आहे. भारताच्या संसदेवर हल्ला झाला. नंतरही अनेक हल्ले झाले. जैश ए मोहम्मदचे हजारो जिहादी हल्ल्याच्या तयारीत होते. पाकिस्तानच्या मदतीशीवाय अतिरेकी असे कार्य होऊच शकत नाही. अशी माहिती विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं जम्मूतील कानाचक्क येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतानं देखील चोख प्रत्यत्तर दिलं असून यामध्ये पाकचा एक सैनिक ठार तर, एक सैनिक जखमी झाला. यानंतर आता सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Loading...

पाकिस्तानातील या दहशतवादी तळांवर झाला हल्ला; फोटो व्हायरल


मसूद अझरचा मेव्हणा ठार?

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.

पाकिस्ताननं मागितली होती एक संधी

दरम्यान, यापूर्वी पाकचे पंतप्रधान इम्नान खान यांनी भारतानं एक संधी द्यावी. पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करून असं म्हटलं होतं. पुलवामा हल्ल्यामध्ये 14 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.


IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...