मला नाही तर या व्यक्तिला द्या शांततेचा नोबेल पुरस्कार; इम्रान खान यांचं उत्तर

मला नाही तर या व्यक्तिला द्या शांततेचा नोबेल पुरस्कार; इम्रान खान यांचं उत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी मला शांततेचा नोबेल पुरस्कार नको अशा आशयाचं ट्विट केलं आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडल्यानंतर पाकिस्तानच्या संसदेमध्ये तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

  • Share this:

इस्लामाबाद, 4 मार्च : भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं भारताच्या हवाली केलं. भारतानं टाकलेला दबाव कामी आला. त्यानंतर भारताचा वाघ अभिनंदन भारतात दाखल झाले. या साऱ्या घडामोडीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना 'शांततेचा नोबेल पुरस्कार' दिला जावा याकरता पाकिस्तानच्या संसदेमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर आता इम्नान खान यांनी नोबेल पुरस्कार मला न देता काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तिला दिला जावा असं मत मांडलं आहे. ट्विटरवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

पाकिस्ताननं केलेला हवाई हल्ला परतवत असताना भारतानं पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडलं. त्यावेळी मिग -21 क्रॅश झाल्यानं विंग कमांडर अभिनंदन पॅराशूटच्या साहाय्यानं पाकिस्तानतच्या हद्दीत उतरले. तेव्हा त्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. पण, भारतानं दबाव टाकताच अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. संसदेमध्ये भाषणादरम्यान इम्रान खान यांनी शांततेसाठी आम्ही पाऊल टाकायला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना नोबेल पुरस्कार दिला जावा असा मत प्रवाह पाकिस्तानमध्ये तयार झाला आहे.

इम्नान यांच्या ट्विटवर काय म्हणाला वसिम अक्रम

दरम्यान, इम्नान खान यांना वसिम अक्रमनं उत्तर दिलं असून, पाकिस्ताननं उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे. कॅप्टन, तुम्हाला नोबेल पुरस्काराची गरज नाही. आमच्या नजरेमध्ये तुम्हाला तो पुरस्कार यापूर्वीच मिळाला आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून आम्हाला सुरक्षित वाटत आहे.

 

हेही वाचा - 'मसूद अझहर जिवंत', पाक लष्करानं बदललं त्याचं ठिकाण

भारतातून देखील इम्रान याचं समर्थन

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी आता भारतातून केली जात आहे. शाह फैजल या माजी आयएएस अधिकाऱ्यांनं ही मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी 3 मार्च रोजी ट्विट देखील केलं. 2010मध्ये युपीएससीत देशात अव्वल येण्याचा मान शाह फैजल यांसीोलनी मिळवला होता. अशी कामगिरी करणारे शाह फैजल काश्मीरमधील पहिलेच विद्यार्थी होते. पण, सरकारच्या ध्येय - धोरणांवर नाराजी व्यक्त करत फैजल यांनी पदाचा राजीनामा दिला.

शाह फैजल आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरणार असल्याची चर्चा सध्या घाटीमध्ये सुरू आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करत इम्नान खान यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल टाकलं. त्यामुळे दक्षिण आशियामधील तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. अशा आशयाचं ट्विट फैजल यांनी केलं आहे.

VIDEO: हकीमपेट विमानतळावर भारतीय लढाऊ विमानांचा थरार

First published: March 4, 2019, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading