उधारीवर किती दिवस जगणार? देश चालवायला पैसेच नाहीत - इम्रान खान

उधारीवर किती दिवस जगणार? देश चालवायला पैसेच नाहीत - इम्रान खान

सौदी अरेबिया, चीन आणि युएई या मित्र देशांच्या मदतीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था तग धरून आहे.

  • Share this:

इस्लामाबाद 12 जून : पाकिस्तान दिवळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी आज देशाला संबोधीत केलं आणि सर्व परिस्थिती सत्य स्थिती लोकांना सांगितली. कर्जाचा प्रचंड बोजा, जवळजवळ ठप्प झालेला विकास, वाढत नसलेला महसूल आणि भ्रष्टाचार यामुळे देश रसातळाला गेल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. परिस्थिती पुन्हा सुरळीत करायची असेल तर देशातल्या प्रत्येकाला पुढं आलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. किती दिवस पाकिस्तान उधारीवर जगणार असा सवाल त्यांनी लोकांना केला.

इम्रान खान म्हणाले, गेल्या 10 वर्षात पाकिस्तानवरच्या कर्जाचा बोजा 6 हजार अब्ज रुपयांवरून 30 हजार अब्ज पाकिस्तानी रुपयांवर गेलाय. जो महसूल मिळतो त्यातला अर्धा भाग हा कर्जाच्या व्याजाचे हफ्ते चुकविण्यात जातात. तर उरलेले पैसे कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्रशासनावर खर्च होतात. त्यामुळे देश कसा चालवायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सौदी अरेबिया, चीन आणि युएई या मित्र देशांच्या मदतीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था तग धरून आहे. तर जागतिक बँकेनेही पाकिस्तानला नुकतच बेलआऊट पॅकेज दिलंय. त्याचबरोबर अटीही लादल्या आहेत. आर्थिक सुधारणा करणं, भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि खर्चावर कपात करणं या गोष्टी इम्रान खान यांना कराव्या लागणार आहेत.

आर्थिक परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तान दिवळखोर देश म्हणून घोषीत केला जाऊ शकतो. असं झालं तर परिस्थिती आणखी बिघडणार असून जगभरातून कर्ज आणि मदत मिळणं बंद होणार आहे. त्यामुळे कसंही करून दिवाळखोर असा शिक्का बसू नये यासाठी पाकिस्तान धडपड करत आहे.

First published: June 12, 2019, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading