इम्रान खान यांनी केलं मोदींचं अभिनंदन, पंतप्रधान म्हणाले आम्हालाही शांतता पाहिजे

इम्रान खान यांनी केलं मोदींचं अभिनंदन, पंतप्रधान म्हणाले आम्हालाही शांतता पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इम्रान खान यांना धन्यवाद दिलेत आणि दक्षिण आशीयात आम्हालाही शांतात हवी आहे असं मत व्यक्त केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 23 मे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणुकीतल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय. ट्विटरवरून इम्रान खान यांनी मोदींना शुभेच्छा दिल्यात. विजयाबद्दल तुमचं अभिनंदन भविष्यात दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सहकार्य निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना उत्तर देत धन्यवाद दिलेत आणि दक्षिण आशीयात आम्हालाही शांतात हवी आहे असं मत व्यक्त केलं. बालाकोट इथं भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. असा तणाव असतानाच मोदी आले तरच दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होण्यास जास्त संधी असल्याचं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं होतं.

या निवडणुकीच्या प्रचारात पाकिस्तानही हा मुद्दा होता.इम्रान खान यांच्याशीवाय जगभरातल्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानहू, श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना, यांच्यासह जगभरातल्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.देशातल्या सगळ्या एक्झिट पोल्सने जे अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा जास्त जागा फक्त भाजपला मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 303 जागा मिळण्याचं जवळपास निश्चित झालंय. तर NDAच्या खात्यात 354 जागा मिळणार आहेत. काँग्रेसला फक्त 51 जागा मिळाल्या आहेत तर UPA 90 जागा मिळण्याचं निश्चित झालंय. तर इतरांना 98 जागा मिळाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:36 PM IST

ताज्या बातम्या