'संघा'मुळेच चिघळला काश्मीरचा प्रश्न, इम्रान खान यांची RSSवर टीका

'संघा'मुळेच चिघळला काश्मीरचा प्रश्न, इम्रान खान यांची RSSवर टीका

काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 11 ऑगस्ट : काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. पाकचा खास मित्र असलेल्या चीन आणि सौदी अरेबियानेही उघडपणे पाठिंबा व्यक्त केला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडलाय. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. काश्मीरचा प्रश्न चिघळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी दोन ट्विट करत संघावर टीका केली. संघ हिंदुत्वाची विचासरणी थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काश्मीरमधली परिस्थिती चिघळली असून तिथल्या संचारबंदीला तीच विचारसरणी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काश्मीरमध्ये अत्याचार आणि दडपशाही होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

'PM मोदी, अमित शहा म्हणजे कृष्ण आणि अर्जुनची जोडी'

काश्मीरसाठीचं 370वं कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झालाय. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न केले. मात्र त्याला यश आलं नाही. एकाही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. भारतासोबतचे राजकीय संबंध कमी करण्याची घोषणाही पाकिस्तानने केली आहे. तर काश्मीरचा प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून भारताच्या राज्यघटनेनुसारच सर्व काही झाल्याचं भारताने ठामपणे सांगितलंय.

VIDEO : अजित पवारांनी सांगितली पूरग्रस्त निष्पाप मुलाची व्यथा

व्यापारही बंद

भारताशी व्यापारी संबंध बंद करणं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलंच भोवलं आहे. हा निर्णय घेऊन पाकिस्तानने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. यामुळे पाकिस्तानच्या मजुरांना काम मिळणंही बंद झालंय.

एरव्ही ईदच्या निमित्ताने पाकिस्तानची बाजारपेठ गजबजलेली असते पण लोकांकडे पैसेच नसल्यामुळे ईदच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव खूपच वाढले आहेत.

पाकिस्तान आधीच महागाईच्या खाईत ढकलला गेला होता. त्यातच भारताशी व्यापार बंद केल्यामुळे ही महागाई आणखी वाढली. प्रत्येकाच्याच घराचं बजेट कोलमडलं आहे. दूध, भाजीपाला, मांसाहारी पदार्थांसाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने घराचं स्वयंपाकघर चालवायचं कसं हाच प्रश्न आहे.

सामानाची देवघेव बंद

भारत आणि पाकिस्तानमध्ये सामान घेऊन त्या बदल्यात सामानाची देवघेव करून व्यापार होत असतो. दोन्ही देशांतल्या व्यापाराची उलाढाल 3 अब्जापर्यंत जाते. ती सगळीच ठप्प आहे. दोन्ही देशांतून 35 - 35 मालवाहू ट्रक जाण्याची परवानगी होती. हे ट्रक आठवड्यातून 4 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सीमेच्या पलीकडे जायचे. हा व्यापार करण्यासाठी 300 व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या मालाच्या खरेदीचा व्यवहार पैशाने होत नाही तर वस्तूच्या बदल्यात वस्तू असा होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या