VIDEO : इम्रान खान यांनी बदलला 'इतिहास' आणि 'भूगोल', Twitterवर निघाली लाज

VIDEO : इम्रान खान यांनी बदलला 'इतिहास' आणि 'भूगोल', Twitterवर निघाली लाज

'इम्रान खान यांनी विदेशात पाकिस्तानची प्रतिमा खराब केली. ऑक्सफर्डमध्ये शिकलात तरी असं कसं होतं.'

  • Share this:

मुंबई 25 ऑगस्ट :  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या ट्विटरवर जोरदार ट्रोल होताहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी जगाचा इतिहास आणि भूगोलच बदलला. आणि तोही आंतराष्ट्रीय व्यासपीठावर. इराण भेटीवर असलेले इम्रान खान यांनी अध्यक्ष हसन रुहानी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्यावरून त्यांना ट्रोल केलं जातंय. जपान आणि जर्मनी यांनी एकमेकांची लाखो माणसं मारली मात्र नंतर त्यांनी सीमेवर संयुक्त उद्योग उभे गेले. दोन देशांचे संबंध चांगले नसतानाही उद्योगाच्या बळावर संबंध मजबूत करता येतात असं ते सांगत होते. जपान आणि जर्मनी हे शेजारी नाही तर दूरवर असलेले देश आहेत त्यामुळे त्यांची लाज काढली जातेय.

धक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय

जपान हा पूर्व आशियात असून जर्मनी युरोपात आहे. त्याचबरोबर ते परस्पराविरुद्ध लढले नाहीत असं इतिहास सांगतो. इम्रान यांना जर्मनी आणि फ्रान्स असं सांगायचं असावं असं म्हटलं जातंय. खान यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होतेय. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी इम्रान खान यांचा व्हिडीओ ट्विट करत त्यावर एक कमेंट केलीय. थँक गॉड, हे सद्गगृहस्थ इतिहास किंवा भुगोलाचे शिक्षक नाहीत असं महिंद्र यांनी म्हटलं आहे.

तब्बल 6 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ते रिट्विट केलंय तर 27 हजार लोकांनी ते लाईक केलंय.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी पाकिस्तानच्या संसदेतच इम्रान खान यांच्यावर टीका केलीय. इम्रान खान यांनी विदेशात पाकिस्तानची प्रतिमा खराब केली असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय. तर पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो यांनीही ट्विटरवरून त्यांच्यावर टीका केलीय.

पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी  इम्रान खान यांचा आणखी एक  व्हिडीओ ट्विट करत त्यांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवलंय. त्यात ते आफ्रिका हा एक उदयोन्मुख देश असल्याचं सांगत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 25, 2019, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading