पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, इम्रान खान यांनी घेतला हा मोठा निर्णय

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, इम्रान खान यांनी घेतला हा मोठा निर्णय

कर्जाचा बोजा, वाढता खर्च, घटत असलेलं उत्पन्न, भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कंगाल झाली.

  • Share this:

इस्लामाबाद 05 मे : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. मदत मिळण्याचे सर्व मार्गही बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. IMF (International Monetary Fund) म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम करणारे पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ डॉ. रजा बाकीर यांची स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

बाकीर यांच्या नियुक्तीमुळे IMFमधून आर्थिक मदत मिळण्यासाठी फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कर्जाचा बोजा, वाढता खर्च, घटत असलेलं उत्पन्न, भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले. त्यामुळे विकासाच्या योजनांवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे.

बाकीर यांचं  हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया च्या बर्कले विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. 2000 पासून ते IMF मध्ये कार्यरत असून ते सध्या इजिप्तचं प्रतिनिधीत्व करत आहेत. भारतात रिझर्व्ह बँकेचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व पाकिस्तानात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचं आहे.

महागाई आकाशाला

कंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्यानं पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाईचे उच्चांक गाठले आहेत. वाढत्या महागाईचे चटके मात्र पाकिस्तानातील जनतेच्या खिशाला बसत आहेत.

पाकिस्तानातील जनता पेट्रोल आणि भाजी-पाल्याचे दर वाढल्यानं आधीच त्रस्त आहे. आता त्यात भर पडली आहे दूध दरवाढीची. दुधानं तर थेट शंभरी गाठली आहे.

VIDEO अक्षरमंत्र भाग 14 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ब, भ, म, य

दूध 180 रुपये लिटर

कराची डेरी फार्मसी असोसिएशनने दुधाच्या दरात लिटरमागे 23 रुपयांची वाढ केली आहे. दुधाचे भाव डेअरीत 120 तर बाजारात 180 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वारंवार दुधाचे दर वाढवण्याची मागणी करूनही पाकिस्तान सरकारनं दुर्लक्ष केल्यानं ही दरवाढ करावी लागत असल्याचं कराची डेरी फार्मसी असोसिएशनचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे इतक्या महाग दरात दूध विकणाऱ्या असोसिएशन, दुकानदारांवर कारवाई केली जात आहे असं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

बँकाही बेजार

मार्च 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 9.41 टक्के होता. वारंवार वाढणाऱ्या महागाईमुळे पाकिस्तानमधील बँकांनी व्याजदरही 10.75 टक्के केला आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट आलं आहे.पाकिस्तान दहशतवादाल थारा देत असल्यानं भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची निर्यात बंद केली होती.

दहशतवादामुळे अडचण

भारतावर करण्यात आलेल्या भ्याड पुलवामा हल्ल्यानंतर भारतानंही पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र गेल्या ६ सातत्यानं पाकिस्तानातील वाढत्या महागाईवर इम्रान खान काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही महिन्यात दिवाळखोर राष्ट्र म्हणून पाकिस्तानकडे पाहिलं जातं का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाकिस्तानातील वाढत्या महागाईमुळे जनतेचे बुरे दिन सुरू झाले आहेत.

First published: May 5, 2019, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading