मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानच्या खोड्या सुरूच, भारतात प्रवेशासाठी 300 अतिरेकी तयार

पाकिस्तानच्या खोड्या सुरूच, भारतात प्रवेशासाठी 300 अतिरेकी तयार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने अतिरेक्यांचे 16 लाँच पॅड सक्रिय केले आहेत. तिथे वेगवेगळ्या गटांमध्ये हे अतिरेकी आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने अतिरेक्यांचे 16 लाँच पॅड सक्रिय केले आहेत. तिथे वेगवेगळ्या गटांमध्ये हे अतिरेकी आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने अतिरेक्यांचे 16 लाँच पॅड सक्रिय केले आहेत. तिथे वेगवेगळ्या गटांमध्ये हे अतिरेकी आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली 26 एप्रिल: सर्व जग सध्या कोरोनाविरुद्ध लढत आहे. मात्र आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या खोड्या काही बंद झालेल्या नाहीत. जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवरून 300 अतिरेकी भारतात पाठविण्याची पाकिस्तानची तयारी असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिलीय. त्यामुळे लष्काराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या काळात राज्यात घातपात घडविण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याची माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने अतिरेक्यांचे 16 लाँच पॅड सक्रिय केले आहेत. तिथे वेगवेगळ्या गटांमध्ये हे अतिरेकी आहेत. संधी मिळताच त्यांना भारतात पाठविण्याचा डाव पाकिस्तान आखत आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवाद्यांना मदत करत आहे. यासाठीच पाकिस्तान सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघनही करत आहे. सीमेवर गोळीबार करून अतिरेक्यांना घुसविण्याची पाकिस्तानची योजना आहे. दुसरी अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक अतिरेक्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला अत्यंत सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड, सर्व जगाला बसला धक्का चकमकीत अतिरेकी ठार झाल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेताना काळजी घेण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून कोरोना पसरण्याचा धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,  पाकिस्तानी लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या घोषणेच्या विरुद्ध जात लष्कराने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. लष्कर आक्रमक झाल्यामुळे इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली असं मतही व्यक्त केलं जात आहे. किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करू नये अशी भूमिका इम्रान खान यांनी घेतली होती. त्याबाबत त्यांनी घोषणाही केली होती. लॉकडाऊन केलं तर गरिबांचे हाल होतील. त्यांना अन्न मिळणार नाही असं त्यांचं मत होतं. मात्र याला छेद देत लष्कराच्या प्रवक्त्याने लॉकडाऊनची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी लष्कर करणार असल्याचं सांगितलं. आतंरराज्य परिषदेच्या माध्यमातून लष्कर प्रशासनामध्ये समन्वयाचं काम करत आहे. त्यामुळे सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे. हा वाद वाढत गेला तर लष्कर सत्ता हातात घेऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
First published:

Tags: India, Pakistan

पुढील बातम्या