काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आक्रमक, इम्रान खान यांचे भारतावर उलटे आरोप!

जम्मू काश्मीरमध्ये सुरुंग पेरून हल्ला घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट होता. त्यामुळे भारताने अतिरेक्यांविरुद्धची आपली मोहीम तीव्र केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 07:25 PM IST

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आक्रमक, इम्रान खान यांचे भारतावर उलटे आरोप!

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेत घातपाताच्या शक्यतेनंतर भारताने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच राज्यातील स्थानिक लोकांव्यतिरिक्त इतरांना काश्मीर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या लष्करानेसुद्धा काश्मीरमधील परिस्थितीवर नजर ठेवली आहे. दरम्यान, आता पाकने आरोप केला आहे की, भारतीय लष्कराने क्लस्टर बॉम्बने हल्ला केला. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावरच आरोप केले आहेत.

इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, नियंत्रण रेषेजवळ निर्दोष लोकांवर भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करतो. भारताने क्लस्टर बॉम्बचा वापर करून 1983 च्या कन्व्हेन्शन ऑन सर्टन कन्वेशन्ल वेपन्सचं उल्लंघन केलं आहे. संयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा परिषदेत अपिल केली आहे की जगाला असलेल्या धोक्याकडे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी याकडे लक्ष द्यावं.

काश्मीरमधील लोकांचे दु:ख कमी करण्याची वेळ आली असल्याचंही इम्रान खान म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाने यासाठी पावले उचलावीत असंही त्यांनी म्हटलं आहे. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर प्रश्न शांततेनं हाताळायला हवा. काश्मीरला न्याय मिळाला पाहिजे असंही इम्रान खान म्हणाले.

Loading...

दरम्यान, काश्मीर प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दलही चर्चा होत होती. त्याचाही इम्रान खान यांनी पुनरुच्चार केला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरुंग पेरून हल्ला घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट होता. त्यामुळे सरकारने अमरनाथ यात्रेकरूंना काश्मीरमधून परत जाण्याचा आदेश दिला. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालर भारतीय लष्कराने अमेरिकी स्नायपर रायफलही हस्तगत केल्या. अतिरेक्यांविरुद्धची लष्कराने आपली मोहीम तीव्र केली आहे.

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, POKमध्ये घुसून दहशतवादी तळ केले नष्ट

'निर्णय पूर्णतः मोदींवरच अवलंबून', ट्रम्प यांच्याकडून पुन्हा काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी ऑफर

राज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: india
First Published: Aug 4, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...