PM मोदींनी पाकिस्तानला दिल्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा, इम्रान खान यांचा दावा

PM मोदींनी पाकिस्तानला दिल्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा, इम्रान खान यांचा दावा

भारताने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : पाकिस्तानात 23 मार्चला राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. त्याच्या अगोदर एक दिवस शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की, त्यांना भारताचे पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खांन यांनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवसानिमित्त मोदींचा मेसेज आल्याचा दावा केला आहे.

इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यानुसार मोदींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते की, मी राष्ट्रीय दिवसाच्या पाकिस्तानला शुभेच्छा देतो. उपखंडातील लोकांनी दहशतवाद आणि भीतीपासून मुक्त होऊन लोकशाही आणि शांततेने प्रगतीसाठी काम करण्याची ही वेळ आहे.

दरम्यान, भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात कोणताही अधिकारी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने 23 मार्चला आयोजित करण्यात येत असलेल्या पाकिस्तान राष्ट्रीय दिवसावर बहिष्कार घातला आहे. पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. यामुळेच भारताने बहिष्काराचा निर्णय घेतला होता.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले आहेत. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता.

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading