इम्रान खान यांनी आता आसाममध्ये खुपसलं नाक; मोदी सरकारबद्दल काय म्हणालेत पाहा...

जम्मू काश्मीरचा Jammu Kashmir विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर Pakistan PM पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांनी त्याविरोधात रान उठवायचा प्रयत्न केला. आता आसामच्या NRC बद्दल वक्तव्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 09:56 PM IST

इम्रान खान यांनी आता आसाममध्ये खुपसलं नाक; मोदी सरकारबद्दल काय म्हणालेत पाहा...

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : जम्मू काश्मीरचा Jammu Kashmir विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर Pakistan PM पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांनी त्याविरोधात रान उठवायचा प्रयत्न केला. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताची बाजू उचलून धरत हा अंतर्गत मुद्दा असल्याचं मान्य केलं. एकदा तोंडावर आपटूनही पाकिस्तानचं मन अजून भरलेलं नाही. आसाममध्ये भारत सरकार करत असलेल्या (NRC) National Register of Citizens नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमावर आता इम्रान यांनी टीका केली आहे. मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा मोदी सरकारचा हा नियोजनबद्ध डाव असल्याचं इम्रान यांनी ट्वीट केलं आहे.

Loading...

पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रथम अणुयुद्धाची धमकी दिली. न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी आपला हेका कायम ठेवल्याचं दिसत आहे. शनिवारच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये संपादकीय पानाच्या शेजारी Oped इम्रान यांचा लेख छापून आला आहे. त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा वापरली आहे. जोपर्यंत जम्मू काश्मीरचा काढून घेतलाल विशेष दर्जा भारत पुन्हा देत नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा होऊ शकत नाही, असं इम्रान यांनी म्हटलं आहे.

VIDEO : इम्रान खान यांच्या पूर्वपत्नीनं केलं मोदींचं कौतुक, पाक सरकारला सुनावलं

त्यानंतर संध्याकाळी आसामच्या नागरिकत्व नोंदणी प्रकल्पाबद्दल त्यांनी ट्वीट केलं. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या यादीत 3.11 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे. पण 19 लाख लोकांना वगळण्यात आलंय. 'मोदी सरकारच्या मुस्लीम वंशसंहाराचा डाव आहे आणि हा त्याचा भाग आहे', असं इम्रान म्हणाले आहेत.

SPECIAL REPORT : रागावलेल्या बाबांची कहाणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 09:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...