कर्जबाजारी पाकिस्तानकडे चहा-बिस्किट खायला पैसे नाहीत, पंतप्रधानांनी घेतला 'हा' निर्णय!

कर्जबाजारी पाकिस्तानकडे चहा-बिस्किट खायला पैसे नाहीत, पंतप्रधानांनी घेतला 'हा' निर्णय!

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं त्यांना 6 अब्ज डॉलर देण्याची मंजूरी दिली आहे मात्र त्यासाठी पाकिस्तानला काही अटी घातल्या आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 26 ऑगस्ट : पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यांना आता चहा-बिस्किटांवर पैसे खर्च करणंही परवडत नाही. भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी कॉस्ट कटिंग सुरू केली आहे. दिवाळखोरीत जाण्यापूर्वी सरकारनं नोकरभरती थांबवली आहे. आथा हा निर्णय घेतला आहे की विकासाकामांच्या योजना सोडल्या तर कोणत्याही कामसाठी नव्या रोजगारांची निर्मिती केली जाणार नाही.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, इमरान खान यांच्या सरकारने अधिकृत बैठीकीमध्ये दिल्या जाणाऱ्या चहापानातही कपात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यामध्ये बैठकीत देण्यात येणारा चहा आणि बिस्किट यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत मधुमेहासारख्या आजारांशी झुंज देणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेक तास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता-पिता बसणं कठीण जाणार असल्याचं डॉन वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या इमरान खान यांच्या पक्षाचे सरकार तिथं आहे. चालू आर्थिक वर्षात कोणतीही नवी गाडी किंवा लष्करी सामना खरेदी करणं बंद केलं असून अनेक प्रकारे कॉस्ट कटिंग करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच काय सरकारनं अधिकाऱ्यांना एकापेक्षा जास्त वृत्तपत्रे किंवा मॅगझीन खरेदीवरही मर्यादा आणल्या आहेत. तसेच सरकारी कार्यालयात कागदाची बचत करण्यासाठी कागदाच्या दोन्ही बाजू वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर देण्याची मंजूरी मिळाली आहे. यासाठी त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. यानुसार सरकारला आर्थिक नुकसान कमी करावं लागेल. याशिवाय इतरही काही अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारने नुकसान कमी करण्यासाठी कॉस्ट कटिंग सुरू केलं आहे.

पाकिस्तानवर 2018-19 या वर्षांत कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यांच्या कर्जात 2.29 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. हे कर्ज गेल्या तीन वर्षात सर्वात कमी आहे हीच काय ती इमरान खान यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानच्या कर्ज अनुक्रमे 6.82 अब्ज डॉलर, 4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलर इतकं आहे.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 10:21 AM IST

ताज्या बातम्या