F16 क्रॅशनंतर पाक वैमानिक त्यांच्याच जमिनीवर उतरला, जमावाने भारतीय समजून घेतला जीव

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. त्यावेळी ते पाक व्याप्त काश्मीरच्या नौशेरामधील लाम गावात उतरले.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 12:40 PM IST

F16 क्रॅशनंतर पाक वैमानिक त्यांच्याच जमिनीवर उतरला, जमावाने भारतीय समजून घेतला जीव

नवी दिल्ली, 02 मार्च : एकीकडे भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना शुक्रवारी 01 मार्चला पाकिस्तानातून भारतात सुपुर्द करण्यात आलं तर दुसरीकडे पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान वायुदलाचे विंग कमांडर शहाजउद्दीन यांना भारतीय जवान समजून पाककडूनच मारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं होतं. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. त्यावेळी ते पाक व्याप्त काश्मीरच्या नौशेरामधील लाम गावात उतरले. यावेळी जमावाने त्यांना भारतीय वैमानिक समजून बेदम मारहाण केली. यात शहाजउद्दीन यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, 'आम्ही भारताची 2 विमानं पाडून 2  वैमानिकांना ताब्यात घेतलं,' असा दावा पाकिस्तानने केला होता. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे. पण या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचा जवान समजून चुकीने त्यांच्याच जवानाला मारलं.

खरंतर भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आणि पाकिस्तानी विंग कमांडर शहाजउद्दीन यांच्यात साम्य अाहे. या दोन्ही कमांडरचं कुटुंब लष्करात आहे. अभिनंदना यांचे वडिला एस. वर्तमान एअर मार्शल होते. तर विंग कमांडर शहाजउद्दीन यांचे वडिल वसीमउद्दीन हेदेखी पाकिस्तानात वायुदलामध्ये एअर मार्शल होते.

दहशतवादी मसूदसाठी पाकची प्रवक्तेगिरी, म्हणे जैशनं पुलवामाची जबाबदारी स्वीकारली नाही

Loading...

व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवलं!

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे अखेर भारतात परतले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण देश त्यांच्या या रिअल हिरोची वाट पाहत होता. अखेर शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा पार करत भारतात प्रवेश केला. याआधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला. पण याचं खरं कारण वेगळंच आहे.

अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेण्यासाठी त्यांना इतक्या वेळ थांबून घेतलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याआधीही अभिनंदन यांना पाकिस्तानकडून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यांना मारहाण करतानाचे, त्याचबरोबर त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून प्रश्न विचारण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. असाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अभिनंदन यांचा अभिमान, पाकिस्तानमधून भारतात येताच सगळ्यात आधी म्हणाले...!

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे तर शनिवारी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

याच ठिकाणी करण्यात आला Pulwama Attack, पाहा 15 दिवसानंतर ग्राऊंड रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...