'सुषमा स्वराज व्हाव्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान'

'सुषमा स्वराज व्हाव्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान'

पाकिस्तानी महिला म्हणते, तुम्ही आमच्या पंतप्रधान असतात तर बरं झालं असतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री काम करताना केवळ देशातीलच नाही तर परदेशातील अनेक नागरिकांना मदत केली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातूनच नव्हे तर परदेशातील लोकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील एका मुलासह पाच जणांना उपचारासाठी व्हिसा दिला होता. स्वराज यांनी पाकिस्तानी मुलांची नावेही ट्विट केली होती. याशिवाय दोन पाकिस्तानी नागरिकांनी मेडिकल व्हिसाची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्याबद्दलही सुषमा स्वराज यांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं.

एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान व्हावं ही इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तानीतील हिजाब आसिफ या महिलेला तिच्या मुलाच्या उपचारासाठी भारतात यायचे होते. तेव्हा सुषमा स्वराज यांनी महिलेला मुलासह भारतात येण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर सुषमा स्वराज यांना टॅग करत हिजाब आसिफने लिहलं होतं की, मी तुम्हाला काय म्हणू? सुपरवुमन? देव? तुमच्या औदार्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.तेव्हा हिजाब आसिफने म्हटलं होतं की, पाकिस्तानमधूनही तुम्हाला खूप सारं प्रेम आणि सन्मान. तुम्ही आमच्या पंतप्रधान असतात तर बरं झालं असतं.

भारतीय लोकांना जर परदेशात अडचण आली असेल तर सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटरवरून त्याबद्दल वेळोवेळी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली आहे. कधी एखाद्या भारतीयावर हल्ला झाला तर कधी कोणी बेपत्ता झाले. पासपोर्टची अडचण झाली असेल किंवा इतर काही मदत हवी असेल तर त्यासाठी त्यांनी जी लागेल ती मदत पुरवली आहे. त्याबाबत त्यांचे आभार सोशल मीडियावरुन अनेकांनी आभार मानले आहेत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या