अमित शहा गाफील राहू नका, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; ISIने ड्रोननं पाठवली शस्त्रे

अमित शहा गाफील राहू नका, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; ISIने ड्रोननं पाठवली शस्त्रे

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

  • Share this:

अमृतसर, 25 सप्टेंबर : पंजाबमधील तरनतानर भागात काही दिवसांपूर्वी स्फोट झाले होते. त्याचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनं पंजाब आणि आजुबाजूच्या राज्यात 26/11 सारखा हल्ला करण्याची तयारी केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये AK-47 आणि इतर हत्यारांची डिलिव्हरी करण्यात आली होती.

पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा दावा केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना यावर उपाय करण्याची विनंती केली आहे. पंजाबमध्ये फिरणाऱ्या ड्रोनवर लवकर कारवाई करा असं कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात 4 खलिस्तानी दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात AK-47 आणि हत्यारे हस्तगत करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता या हत्यारांचा पुरवठा जीपीएस फिटेड ड्रोनच्या मदतीनं सीमेपलिकडून केल्याचं समोर आलं.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून म्हटलं की, सीमेपलीकडून पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून भारतात शस्त्रे आणली जात आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा घातपात घडवण्याचा कट आहे असंही अमरिंदर सिंग म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तानच नव्हे तर दहशतवादी संघटनांनी देखील मोदी सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचा बदला घेण्याचा कट आखला आहे. पाकिस्तानकडून अभय मिळणाऱ्या जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांनी भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखला आहे. यात प्रामुख्याने महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षासल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ले करण्याचा कट 'जैश' आखत आहे. यासाठी विशेष दहशतवाद्यांचे पथक तयार करत असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. देशातील 30 शहरातील पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. यात जम्मू, अमृतसर, पठानकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह 30 शहरात अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात पावसाचा कहर; कोंढवा येवलेवाडी परिसरात पाणीच पाणी

First published: September 25, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading