ईदच्या दिवशीही पाकची कारस्थानं, राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद

ईदच्या दिवशीही पाकची कारस्थानं, राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद

आज देशभरात ईदचा उत्साह असताना काश्मीर मात्र अशांत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 16 जून : आज देशभरात ईदचा उत्साह असताना काश्मीर मात्र अशांत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. जोरदार गोळीबार आणि काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे.

राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. आज सगळीकडे ईद साजरी होत असतानाही पाकिस्तानची कारस्थान काही थांबत नाही आहे.

एका वरिष्ठ लष्करी अधिका-याच्या सांग्यानुसार, शनिवारी म्हणजे आज पाकिस्तानकडून सीमा रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला, जो अद्याप सुरू आहे. या गोळीबारात बिकास गुरूंग नावाचा एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्करीही पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज झालं आहे.

अलिकडच्या काळात पाकिस्तानशी संबंधीत तणावाचा परिणाम अटारी-वाघा सीमेवर दिसलाय. कारण बीएसएफ आणि पाक रेंजर्स यांनी या वर्षी ईदवर एकमेकांना मिठाई देखील वाटलेली नाही.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने संशयास्पद परिस्थितीत दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे.

ईदच्या दिवशी या पाकिस्तानी नागरिकांना काश्मिरमध्ये प्रवेश कसा मिळाला याबद्दल आता बीएसएफकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

First published: June 16, 2018, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading