पाकिस्तानचे पुन्हा होणार का तुकडे? लष्कराची डोकेदुखी वाढली

पाकिस्तानचे पुन्हा होणार का  तुकडे? लष्कराची डोकेदुखी वाढली

पठाणांची ही चळवळ दडपूण टाकण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र त्यात त्यांना यश येत नाही.

  • Share this:

इस्लामाबाद 13 मे : पाकिस्तान गेली कित्येक दशकं भारताविरुद्ध दहशतवादाला मदत करत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक दहशतवादी संघटनांना जन्मही दिलाय. मात्र हे करत असतानाच अनेक प्रांतात खदखदणाऱ्या असंतोषाकडे मात्र पाकिस्तानने लक्ष दिलं नाही. आता बलुचिस्तान प्रमाणेच 'पख्तूनिस्तान'च्या मागणीने जोर धरला आहे. त्यासाठीचं आंदोलन वाढत असून पाकिस्तानी लष्कराची डोकेदुखीही वाढली आहे.

स्वत:ला कट्टर मुस्लिम देश म्हणणारा पाकिस्तान आपल्याच देशातल्या लोकांवर अत्याचार करतो हे आता जगाला कळालं आहे. याच अत्याचारामुळे पाकिस्तानातल्या अनेक प्रांतांमध्ये वेगळेपणाची भावना वाढिस लागली. वेगळ्या बलुचिस्तानसाठीचं आंदोलन बळ धरत असतानाच आता वेगळ्या 'पख्तूनिस्तान'साठीही आंदोलनाने जोर धरलाय.

पठाणांना पाहिजे 'पख्तूनिस्तान' 

अफगाणिस्तान सीमेजवळ राहणाऱ्या पठाणांसाठी वेगळा 'पख्तूनिस्तान' पाहिजे अशी इथल्या लोकांची मागणी आहे. यासाठी पख्तून तहफ्फुज मुव्हमेंट म्हणजेच PTM ही संघटना आंदोलन करत आहे. या संघटनेचा तरुण नेता मंजूर पश्तीन चांगलाच लोकप्रीय झालाय. त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होत असल्याने पाकिस्तानी लष्कराचे धाबे दणाणले आहेत.

पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासूनच इथे 'पख्तूनिस्तान'ची मागणी होती. मात्र इथल्या लोकांची मतं ऐकून न घेता पाकिस्तानी लष्कराने कायम दडपशाही केली. त्यामुळे हा उद्रेक जास्त वाढला आहे. हे पश्तुनी पठाण अतिशय आक्रमक असून लढवय्ये आहेत. या संघटनेला अफगाणिस्तानची फूस असा असा पाकिस्तानाचा आरोप आहे.

पठाणांची ही चळवळ  दडपूण टाकण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र त्यात त्यांना यश येत नाही. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशी परिस्थिती असताना वेगळं होण्यासाठी आंदोलनं वाढत असल्याने त्याचा फटका इम्रान खान सरकारला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. मदत मिळण्याचे सर्व मार्गही बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. IMF (International Monetary Fund) म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम करणारे पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ डॉ. रजा बाकीर यांची स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

बाकीर यांच्या नियुक्तीमुळे IMFमधून आर्थिक मदत मिळण्यासाठी फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कर्जाचा बोजा, वाढता खर्च, घटत असलेलं उत्पन्न, भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले. त्यामुळे विकासाच्या योजनांवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे.

बाकीर यांचं  हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया च्या बर्कले विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. 2000 पासून ते IMF मध्ये कार्यरत असून ते सध्या इजिप्तचं प्रतिनिधीत्व करत आहेत. भारतात रिझर्व्ह बँकेचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व पाकिस्तानात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचं आहे.

First published: May 13, 2019, 5:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading