हे काय चालले? 10वीच्या प्रश्नपत्रिकेत पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला ‘आझाद काश्मीर’

हे काय चालले? 10वीच्या प्रश्नपत्रिकेत पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला ‘आझाद काश्मीर’

अवैध ताब्यात घेतलेल्या या भागाला पाकिस्तान आझाद काश्मीर असं म्हणत असतो. तर हा भारताचाच भाग आहे असा आपला कायमचा ठाम दावा आहे.

  • Share this:

भोपाळ 07 मार्च :  अनेक राज्यांमध्ये सध्या 10वीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा हा महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे 10वीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा अतिशय महत्त्वाची समजली जाते. मात्र याच परीक्षेत शिक्षक किती बेजबाबदारपणा करू शकतात याचा नमुना नुकताच उघडकीस आलाय. सोशल सायन्स या विषयातल्या प्रश्नपत्रिकेत पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद काश्मीर असा करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झालाय. स्वातंत्र्यानंतर काही दिवसांमध्येच पाकिस्तानी सैनिक आणि टोळीवाल्यांनी आक्रमण करून काश्मीरच्या काही भागावर अवैध कब्जा केला आहे. तेव्हापासून तो वादग्रस्त भाग बनला आहे. हा आमचा अविभाज्य भाग आहे अशी भारताची कायम आणि ठाम भूमिका राहिली आहे. त्यामुळे या भागाचा असा उल्लेख केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय.

अवैध ताब्यात घेतलेल्या या भागाला पाकिस्तान आझाद काश्मीर असं म्हणत असतो. तर हा भारताचाच भाग आहे असा आपला दावा आहे. पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान असताना हा भाग मिळविण्यासाठी एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आणि त्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेतही पाकव्याप्त काश्मीरमधल्या भागासाठी 24 जागा सोडलेल्या आहेत. 10 वीच्या परीक्षेत जोड्या लावा असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात भारत पाकिस्तान युद्ध असं एका भागत तर दुसऱ्या भागात आझाद काश्मीर असा उल्लेख केला आहे. तिथे पाकव्याप्त काश्मीर असा शब्द अभिप्रेत होता.

मात्र प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना त्याचं भान राहिलं नसावं असा आरोप केला जातोय. त्यामुळे त्याने आझाद काश्मीर असा पर्याय टाकला आणि नंतरच्या सर्व चाळण्यांमध्येही तो तसाच राहिला. यामुळे खळबळ उडाली असून भाजपने मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिक्षण मंडळ यावर कुठलाही निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: March 7, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या