Controversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू

Controversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू

पाकिस्तानात जाण्याच्या उत्साहात सिद्धू यांच्याकडून कळत- नकळत चूक झाली

  • Share this:

इस्लामाबाद, १८ ऑगस्ट- पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि तेहरिक- ए- इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात काँग्रेस नेते आणि भारतीय माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. पाकिस्तानात जाण्याच्या उत्साहात सिद्धू यांच्याकडून कळत- नकळत एक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट करणे आणि दुसरी म्हणजे पाकिस्तान अधिकृत काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसणे. मसूद खान यांच्या बाजूला बसलेल्या सिद्धूंचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या कृतीवर त्यांना अनेक प्रश्नही विचारले जात आहेत.

VIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री

बाजवासोबत गळाभेट-

इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात नवज्योत सिंह सिद्धू आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांच्या भेटीवरून सध्या वादंग उठत आहे. इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याच्याच दिवशी शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबारी करण्यात आली. अशावेळी सिद्धू यांचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना गळाभेट करणं अनेकांना पटलं नाही. यावरुनच सध्या सिद्धू सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. हे कमी की काय, शपथ विधी सोहळ्यात सिद्धू पीओकेचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूलाच बसलेले दिसत आहेत. काश्मिर मुद्यावरुन भारत- पाकिस्तानमध्ये विस्तवही जात नाही हे संपूर्ण जगाला माहित आहे. असे असतानाही सिद्धू यांचे मसूद खान यांच्या शेजारी बसणं योग्य नाही अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत.

First published: August 18, 2018, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading