काय करावं या पाकिस्तानचं ? 'फेसबुक लाइव्ह'मध्ये मांजर झाले मंत्री

काय करावं या पाकिस्तानचं ? 'फेसबुक लाइव्ह'मध्ये मांजर झाले मंत्री

पाकिस्तानच्या मंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह द्वारे एक पत्रकार परिषद घेतली पण याच वेळी त्यांच्या फेसबुक लाइव्हला कॅट फिल्टर लागला आणि मंत्री महोदय मांजरीसारखे दिसू लागले!

  • Share this:

इस्लामाबाद, 15 जून : फेसबुक लाइव्ह हे सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फारच चांगलं माध्यम आहे. पण हे फेसबुक लाइव्ह करताना खूप खबरदारी घ्यावी लागते. पाकिस्तानचे एक मंत्री अशा फेसबुक लाइव्हमध्ये चांगलेच फसले.

पाकिस्तानमधल्या खैबर पख्तूनख्वाहचे माहिती आणि प्रसारण मंत्री शौकत युसूफझई यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती.

ही पत्रकार परिषद त्यांनी फेसबुकवरून लाइव्ह केली. पण याच वेळी त्यांच्या फेसबुक लाइव्हला कॅट फिल्टर लागला आणि मंत्री महोदय मांजरीसारखे दिसू लागले!

सोशल मीडियावर अशी झालेली फजिती त्यांना चांगलीच महागात पडली. त्यांच्या नावाने आता खूप जोक्स फिरायला लागले आहेत. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची खिल्ली उडवणं सुरू केलं आहे.

शौकत युसूफझई हे या लाइव्ह पत्रकार परिषदेत 'कॅट फिल्टर' मुळे मांजर बनलेच पण आता त्यांच्या चेहऱ्याला मांजरासारखे कान आणि मिशा लावलेले फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

या पत्रकार परिषदेत शौकत यसूफझई खैबर पख्तुनख्वा विधानसभेने घेतलेले महत्त्वाचे निर्णय सांगत होते. पण या कॅट फिल्टरमुळे सगळा विचका झाला. मांजराच्या रूपात हे सगळे मंत्री खूपच 'क्यूट' दिसत आहेत, अशीही प्रतिक्रिया ट्विटरवर एकाने दिली आहे.

=====================================================================================================

VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...

First published: June 15, 2019, 8:10 PM IST

ताज्या बातम्या