पाकिस्तानने 32 वर्षात पहिल्यांदाच ठोकले दहशतवादी शिबिरांना कुलूप

सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रचंड धास्ती बसलीय. त्यामुळे कारवाई करणं भाग पडलंय.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 09:49 PM IST

पाकिस्तानने 32 वर्षात पहिल्यांदाच ठोकले दहशतवादी शिबिरांना कुलूप

नवी दिल्ली 21 मे : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने घेतलेली आक्रमक भूमिका आणि जागतिक दबावाचा पाकिस्तानवर परिणाम झाला आहे. पाकिस्तानने गेल्या 32 वर्षात पहिल्यांदाच दहशतवादी शिबिरांना बंद केल्याची माहिती आहे पुढे आलीय. काश्मीरमधल्या प्रसिद्ध 'काश्मीर रीडर' या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. आता यापुढे काश्मीरमधल्या दहशतवादी गटांना बळ देणं परवडणारं नाही असं दिसू लागल्याने पाकिस्तानने ही कारवाई केल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

पाकिस्तानने युनायटेड जिहादी कॉन्सिलच्या 12 कार्यालयांना ताळं ठोकलंय. काश्मीरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या संघटनांना पाकिस्तान आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देत होता. जिहादच्या नावावर या संघटना काश्मीर आणि भारतात हिंसाचार घडवून आणत होत्या. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रचंड धास्ती बसलीय. यापुढे अशाच कारवाया सुरू राहिल्या तर भारत गप्प बसणार नाही असा इशारा पाकिस्तानला दिला गेला.

त्याचबरोबर मागच्या महिन्यात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आल्याने पाकिस्तानवरचा दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन होत असल्याची जाणीव पाकिस्तानला झाली. त्यातच आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने पाकिस्तान हतबल झाला आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवरून मदत मिळण्यात या प्रतिमेचा अडसर होत असल्याने पाकिस्तानने ही कारवाई केलीय.

मात्र पाकिस्तान ठोस करवाई करतो याची खात्री झाल्याशीवाय शांतात बोलणी सुरू ठेवणार नाही अशी भारताची भूमिका आहे. हिंसाचार आणि शांतता बोलणी एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं सांगितल्याने पाकिस्तान आता पुढची पाऊलं काय टाकतो यावर भारताचं लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: May 21, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...