'दहशतवादासाठी पाकिस्तानचा वापर होऊ देणार नाही'

'दहशतवादासाठी पाकिस्तानचा वापर होऊ देणार नाही'

दहशतवादासाठी पाकिस्तानचा वापर होऊ देणार नाही असं इम्नान खान यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 9 मार्च : दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जमिनीवरून दहशतवाद पोसणार नाही असं विधान केलं आहे. यापूर्वीच्या सरकारनं दहशतवाद वाढवला अशी टीका देखील यावेळी इम्नान खान यांनी करत दहशतवाद हे आपलं पाप नसल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी त्यांनी याबाबतचं विधान केलं. पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढत गेला. त्यानंतर पाकिस्ताननं दहशतवाद्यांशी संबंधित घटनांवर बंदी घालत काहींना ताब्यात देखील घेतलं. शिवाय, काही मदरशांवर देखील कारवाई केली.

दरम्यान, वाढता दबाव पाहता पाकिस्तान हा दहशतवादाचा आश्रयदाता नाही हे इम्नान खान सतत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादाचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्र संघात गेला असून भारताला अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्सनं देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताचा हा मोठा राजनैतिक विजय असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटा पडला आहे.


भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच गोळीबार, PSI मोहिते गंभीर जखमी


अल्पसंख्यांकांच्या मुद्यावरून भारतावर टीका

यावेळी इम्नान खान यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. पण, भारतात मात्र मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचं म्हणत भारतावर विनाकारण आगपाखड करण्याचा प्रयत्न केला.


पाकिस्तानच दहशतवादाचा पोशिंदा

पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाला थारा नाही, अशी भाषा करणारा पाकिस्तानच दहशतवादाला पोसत असल्याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. पाकिस्तनामध्ये दहशतवाद्यांचे जवळपास 22 कॅम्प आहेत. यामधील 9 कॅम्प हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठिंबा देत आहे हे स्पष्ट होतं.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं घेतली होती. त्यानंतर भारतानं देखील एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दरम्यान, भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननं आम्ही दहशतवादाला पाठिशी घालत नाही. भारताला देखील जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पण, भारतानं पाकिस्तानी विमानांचा भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.


Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 11:29 AM IST

ताज्या बातम्या