AIR STRIKE नंतर पाकिस्तानी महिलेनं मानले मोदींचे आभार; काय आहे तिचं भारतीय कनेक्शन

AIR STRIKE नंतर पाकिस्तानी महिलेनं मानले मोदींचे आभार; काय आहे तिचं भारतीय कनेक्शन

AIR STRIKE मुळे भारत - पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले होते. दोन्ही देशांनी काही काळ विमानसेवा देखील बंद केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली; 09 जून : जन्मानं पाकिस्तानची असलेल्या महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले. सुमैरा असं या महिलेचं नाव आहे. आता तुम्हाला असा प्रश्न नक्की पडला असेल की, पाकिस्तानी महिलेनं AIR STRIKE नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार का मानले? मुळची पाकिस्तानी असलेल्या महिलेचं लग्न एका भारतीय नागरिकांशी झालं. हैद्राबादमधील शैज एजाज मोहियुद्दीनशी 2011मध्ये सुमैरानं लग्न केलं. या दोघांना 2 मुलं आहेत.

आपल्या वडिलांना भेटायला सुमैरा पाकिस्तानमध्ये गेली होती. पण, एअर स्ट्राईकमुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आणि सुमैरा पाकिस्तानमध्ये अडकून पडली. पाच दिवस ती आपल्या मुलांसह लाहोर विमानतळावर होती. पण, परिस्थिती काही सुधारत नव्हती. काही दिवसानंतर व्हिसा देखील संपला. अखेर पती आणि सासऱ्यानं परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. या साऱ्या प्रकरणामध्ये परराष्ट्र मंत्रालयलानं मदत केली. अखेर 30 मे रोजी सुमैरा भारतात परतली. 3 महिन्यानंतर पतीची भेट झाल्यानंतर सुमैराचा आनंद गगनात मावेनासा झाला . आपल्या कुटुंबासोबत भारतात ईद साजरी करता यावी अशी इच्छा सुमैराची इच्छा होती. अखेर ती पूर्ण झाल्याचं सुमैरानं सांगितलं. त्यासाठी तिनं नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचे आभार मानले.

आता रेल्वेच्या या मार्गांवर मिळणार ‘मसाज’ सर्विस

दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले

एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमध्ये संबंध हे बिघडले होते. शिवाय, विमान सेवा देखील बंद करण्यात आली होती. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले होते. AIR STRIKE नंतर दोन्ही देशांमध्ये बिघडलेले संबंध पुन्हा एकदा सुधारताना दिसत आहेत.

बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस, यासोबत इतर महत्त्वाच्या घडा

First published: June 9, 2019, 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading