मराठी बातम्या /बातम्या /देश /

कर्तारपूर गुरुद्वारा आज भारतात असते.. पण, एका व्यक्तीची चूक नडली

कर्तारपूर गुरुद्वारा आज भारतात असते.. पण, एका व्यक्तीची चूक नडली

शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक असलेलं करतारपूर साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठीचा करतारपूर साहिब कॉरिडॉर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, भारतात असलेलं हे ठिकाण एका व्यक्तीच्या चुकीमुळे पाकिस्तानात गेलं आहे. काय आहे यामागचा इतिहास? जाणून घेऊया.

शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक असलेलं करतारपूर साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठीचा करतारपूर साहिब कॉरिडॉर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, भारतात असलेलं हे ठिकाण एका व्यक्तीच्या चुकीमुळे पाकिस्तानात गेलं आहे. काय आहे यामागचा इतिहास? जाणून घेऊया.

शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक असलेलं करतारपूर साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठीचा करतारपूर साहिब कॉरिडॉर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, भारतात असलेलं हे ठिकाण एका व्यक्तीच्या चुकीमुळे पाकिस्तानात गेलं आहे. काय आहे यामागचा इतिहास? जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 17 नोव्हेंबर : केंद्र सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर (Kartarpur Sahib Corridor) आज 17 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून करतारपूर साहिब गुरुद्वाराला (Kartarpur Gurdwara) भेट देणाऱ्या भारतातील यात्रेकरूंना व्हिसा मुक्त प्रवेश दिला जातो. हा गुरुद्वारा करतारपूर साहिब शीख धर्माचे संस्थापक (Founder of Sikhism) गुरु नानक देव (Guru Nanak Dev) यांचे अंतिम विश्रामस्थान आहे. गुरु नानक यांची जयंती म्हणून साजरे होणारे गुरुपर्व यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. गुरुद्वारा करतारपूर साहिब हे शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाणी पुन्हा उघडणे हा पंजाबसाठी भावनिक मुद्दा आहे. मात्र, भारताचा भाग असलेलं हे क्षेत्र एका वकिलाच्या चुकीमुळे पाकिस्तानमध्ये गेलं आहे. या गुरुद्वाराच्या इतिहासाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

फाळणीच्या वेळी इंग्रज वकिलाच्या चुकीमुळे करतारपूर गुरुद्वारा पाकिस्तानच्या भागात गेले. दुर्लक्ष आणि युद्धाच्या हल्ल्यांमुळे ते जीर्ण झाले. लोकं तिथं गुरे चारायला नेऊ लागले. पण 90 च्या दशकात पाकिस्तान सरकारने त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे गतवैभव त्याला पुन्हा मिळाले.

करतारपूर गुरुद्वाराचा इतिहास History of Kartarpur Gurdwara

करतारपूर साहिब हे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात रावी नदीजवळ आहे. त्याचा इतिहास 500 वर्षांहून अधिक जुना आहे. याची स्थापना शिखांचे गुरु नानक देव यांनी 1522 मध्ये केली असे मानले जाते. गुरु नानक देव यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षे या ठिकाणी व्यतीत केली.

रावी नदीचा प्रवाह सीमा म्हणून ग्राह्य धरल्याने हे क्षेत्र पाकिस्तानात Ravi River flow Border

लाहोर ते करतारपूर साहिब हे अंतर 120 किलोमीटर आहे. त्याच वेळी, ते पंजाबमधील गुरुदासपूर भागात भारतीय सीमेपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांच्या 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकानुसार, इंग्लिश वकील सर क्रिल रॅडक्लिफ यांना फाळणीचा नकाशा काढण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी होता आणि त्यांना भारताच्या भौगोलिक स्थानाची माहिती नव्हती. अशा स्थितीत त्यांनी रावी नदीच्या प्रवाहालाच सीमा बनवली. करतारपूर गुरुद्वारा रावीच्या पलीकडे होते, त्यामुळे ते पाकिस्तानच्या भागात गेले.

भारत-पाक युद्धामुळे गुरुद्वाराचे खूप नुकसान damage to Gurdwara due to Indo-Pak war

1965 आणि 71 च्या युद्धात या गुरुद्वाराचे खूप नुकसान झाले. 90 च्या दशकात गुरुद्वाराची इमारत खूप जीर्ण झाली होती. लोकं इथे गुरे बांधू लागली. परिणामी गुरुद्वाराचे इतिहास पुसट होऊ लागला. ज्या भारतीयांना त्याचे महत्त्व माहीत होते, त्यांच्यापैकी मोजकेच इथं जात असत. त्यांनाही वाघा बॉर्डरवरून जावे लागत असे.

दोन्ही देशांच्या सरकारांच्या प्रयत्नातून कॉरिडॉरची निर्मिती

1998 नंतर पाकिस्तान सरकारने गुरुद्वाराकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली. 1999 मध्ये त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सुरू झाली, त्यानंतर पाकिस्तान शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने सरकारला गुरुद्वाराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर बरेच वर्ष बांधकाम सुरू राहिले. नंतर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधील करतारपूर येथील पवित्र गुरुद्वाराला जोडणारा कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला. कॉरिडॉरची पायाभरणी 26 नोव्हेंबर 2018 रोजी भारतात आणि 28 नोव्हेंबर 2018 रोजी पाकिस्तानमध्ये झाली. 9 नोव्हेंबर 2019 रोजी गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त हा कॉरिडॉर सर्वांसाठी खुला करण्यात आला.

First published: