News18 Lokmat

पाकिस्तानचा कट्टर दुश्मन आहे हा देश, नागरिकांना जायलाही आहे बंदी

इस्रायल पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे राजनैतिक किंवा व्यावहारिक संबंध ठेवत नाही. या दोन देशांमध्ये एवढं कट्टर वैर आहे की इस्रायल आपल्या नागरिकांना पाकिस्तानला जाण्याची परवानगीही देत नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 06:39 PM IST

पाकिस्तानचा कट्टर दुश्मन आहे हा देश, नागरिकांना जायलाही आहे बंदी

जेरुसलेम, ३० मार्च : मसूद अझरच्या बंदीवरून जगभरात पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे. चीनने मात्र पाकिस्तानची पाठराखण केली आहे पण जगभरात असा एक देश आहे की त्या देशाने पाकिस्तानशी पूर्णपणे शत्रुत्व पुकारलं आहे. एवढंच नव्हे तर या देशाने पाकिस्तानला एक देश म्हणूनही मान्यता दिलेली नाही. एक देश जेव्हा दुसऱ्या देशाची मान्यताच नाकारतो तेव्हा शत्रू असलेल्या देशाशी कोणतेही संबंध ठेवण्याची त्या देशाची इच्छा नसते.इस्रायल आणि पाकिस्तान या देशांमध्ये अशाच प्रकारे कोणतेही संबंध नाहीत.

पासपोर्टवर पाकला जायची बंदी

इस्रायल पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे राजनैतिक किंवा व्यावहारिक संबंध ठेवत नाही. या दोन देशांमध्ये एवढं कट्टर वैर आहे की इस्रायल आपल्या नागरिकांना पाकिस्तानला जाण्याची परवानगीही देत नाही. इस्रायली नागरिकांच्या पासपोर्टवर लिहिलेलं असतं, 'हा पासपोर्ट इस्रायल सोडून इतर सगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी योग्य आहे.'

पाकिस्तानने धर्माच्या आधारावर पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे. त्यामुळे इस्रायलचा पाकिस्तानला पूर्ण विरोध आहे. 1948 मध्ये झालेल्या विभाजनानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश बनले. या दोन देशांमधली गाझा पट्टी मात्र वादग्रस्त आहे. यावर नेमकं नियंत्रण कुणाचं यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये वारंवार हिंसक संघर्ष उफाळून येतो.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या संघर्षाचं मूळ शोधायचं असेल तर थोडं इतिहासात जायला हवं. जेरुसलेममध्ये यहुदी धर्माचा उगम झाला त्याचबरोबर इथे ख्रिश्चन धर्माचंही मूळ आहे, असं मानलं जातं.त्यामुळे जेरुसलेमचा भागही वादग्रस्त आहे.

Loading...

स्वतंत्र उपग्रह

इस्रायलचं लष्कर, नौदल आणि वायुदलामध्ये अतूट संबंध आहेत. ही तिन्ही दलं देशाच्या संरक्षाणासाठी एकमेकांच्या कायम संपर्कात असतात. त्यांचा संरक्षण विभाग काटेकोर आहे. इस्रायल आपले उपग्रह कोणत्याही देशाशी शेअर करत नाही. आपल्या देशातली माहिती दुसरीकडे जाऊ नये हाच त्यांचा उद्देश आहे. या देशाने आतापर्यंत ७ युद्धं केली आहेत आणि ती सगळी जिंकलीही आहेत.

इस्रायल हा पूर्णपणे ज्यूंचा देश आहे. इस्रायलबाहेर राहणाऱ्या ज्यू लोकांनाही या देशाचे नागरिक समजलं जातं. या कोणत्याही नागरिकाने पाकिस्तानशी संबंध ठेवणं इस्रायलला अमान्य आहे.

=========================================================================================================================================================

VIDEO: 'सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय इंदिरा गांधी घेऊ शकतात, तर मोदी का नाही?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...