‘पाकिस्तान ‘ड्रोन्स’चा वापर करत शस्त्र आणि ड्रग्जही पोहोचवतोय भारतात, MEA चा धक्कादायक खुलासा

‘पाकिस्तान ‘ड्रोन्स’चा वापर करत शस्त्र आणि ड्रग्जही पोहोचवतोय भारतात, MEA चा धक्कादायक खुलासा

पंजाब आणि काश्मीरमधल्या सीमावर्ती भागात ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवढा करतो आहे. अशा प्रकारची अनेक ड्रोन्स सुरक्षा दलांना ताब्यात घेतली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 22 ऑक्टोबर: अनेक वेळा भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानला अजुनही जाग आलेली नाही. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने 3800 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली आहे. त्याच बरोबर पाकिस्तान आता ड्रोन्सचा वापर करत भारतात दहशतवाद्यांना शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवढा करत असल्याचा धक्कादायक खुलासाही परराष्ट्रमंत्रालयाने केला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये यासंबंधात काही घटना उघडकीस आल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावरून पाकिस्तानवर ठपका ठेवला आहे. पाकिस्तान अजुनही दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपांचाही भारताने पुनरुच्चार केला आहे.

पंजाब आणि काश्मीरमधल्या सीमावर्ती भागात ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवढा करतो आहे. अशा प्रकारची अनेक ड्रोन्स सुरक्षा दलांना ताब्यात घेतली आहेत. AK-47सारख्या अत्याधुनिक रायफल्सचा त्यात समावेश होता.

एवढच नाही तर ड्रग्जचाही त्यात समावेश असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळ भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, चीन सोबतची लष्करी आणि राजकीय स्तरावरची चर्चा सुरूच राहणार असल्याचं भारताने म्हटलं आहे. सीमेवरच्या तणावाचं वादात आणि वादाचं रुपांतर गंभीर स्थितीत होणार नाही याची काळजी घेण्याचं दोन्ही देशांनी मान्य केल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

US Elections अमेरिकेत या वेळी सोपं नाही मतदान करणं; जाणून घ्या कारणं

गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध धडक मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने चकमकी घडत आहेत. हिवाळ्याच्या आधी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसविण्याचाही पाकिस्तानचा डाव आहे. सुरक्षा दलांना नुकताच पाकिस्तानने सीमेवर खोदलेला एक बोगदाही आढळला होता. चिनी इंजिनिअर्सच्या मदतीने हा बोगदा खणण्यात आल्याचं उघड झालं होतं.

दहशतवाद्यांना भारतात पाठविण्यासाठी आणि त्यांना पुन्हा परत पळून जाण्यासाठी या बोगद्याचा उपयोग करण्याचा डाव उघडकीस आला होता.

दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी सप्टेंबर महिन्यात उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं होतं. लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

सावधान! तुमचं Sim Card होवू शकतं ‘क्लोन’, मुंबईतल्या व्यापाऱ्याला 2 कोटींचा फटका

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली होती. दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले ते रहिवासी असून राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस अशी त्यांची नावेही सुरक्ष दलानेजाहीर केली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 22, 2020, 9:21 PM IST

ताज्या बातम्या