मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP च्या 1000 लोकांच्या धर्मांतरामागे आहे पाकिस्तानचा हात? ATS तपासात या 10 गोष्टी झाल्या उघड

UP च्या 1000 लोकांच्या धर्मांतरामागे आहे पाकिस्तानचा हात? ATS तपासात या 10 गोष्टी झाल्या उघड

उत्तर प्रदेशमधील शेकडो निरागस मुलं, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत ATS ने धक्कादायक खुलासा केला असून, या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचं उघडकीस आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील शेकडो निरागस मुलं, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत ATS ने धक्कादायक खुलासा केला असून, या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचं उघडकीस आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील शेकडो निरागस मुलं, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत ATS ने धक्कादायक खुलासा केला असून, या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचं उघडकीस आलं आहे.

लखनौ, 22 जून: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) शेकडो हजारों निरपराध मुले, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत (Religion Conersion) उत्तर प्रदेश एटीएसनं (UP ATS) धक्कादायक खुलासा केला असून, या प्रकरणात पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याचं आणि धर्मांतराच्या नावावर मोठा निधी पुरवला जात असल्याचं उघडकीस आलं आहे. यामुळं आता केंद्रीय सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीदेखील (ED) या प्रकरणातील परकीय निधीची चौकशी करणार आहे. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच उत्तर प्रदेश सरकार केंद्रीय गृह मंत्रालयाला लेखी पत्र देऊन या प्रकरणाची माहिती देणार असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर यंत्रणेकडं या प्रकरणाची चौकशी सोपवली जाऊ शकते. एकूणच या प्रकरणानं देशभरात खळबळ माजवली आहे. जाणून घेऊया यातील महत्त्वाच्या दहा घडामोडी.

1) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, यामध्ये सामील असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. दोषींवर गँगस्टरवर करतात त्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

2) फतेहपूर जिल्ह्यातील पंथुआ गावात राहणारा उमर गौतम (Umar Gautam) क्षत्रिय कुटुंबातील आहे. उमरचे वडील धनराज सिंह हे नामांकित क्षत्रिय कुटुंबातील असून सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. धनराजच्या 6 मुलांपैकी चौथा मुलगा उमर आहे. उमरचे पूर्वीचे नाव श्याम प्रताप होते. त्यानं 12 वी नंतर पंतनगर इथं कृषी अभ्यासक्रम आणि त्यानंतर एमएमयूमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्याचा विवाह शेजारच्या गावातील राजेश्वरी हिच्याशी झाला होता. उमरनं राजेश्वरीचंही धर्मांतर करून तिला रझिया केलं आणि स्वतः श्याम प्रताप उर्फ उमर गौतम बनला. धर्मांतर केल्यानं त्याला वडिलांनी कुटुंबातून बेदखल केलं.

3) उमरचा चुलत भाऊ राजू सिंह यांच्या मते, त्याचं लग्न खेसहन गावच्या राजपूत कुटुंबात झालं होतं. दीड वर्षापूर्वी उमरचे वडील धनराजसिंग यांचं निधन झालं, परंतु वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही तो आला नाही. पहिला भाऊ उदयराज प्रताप सिंह, दुसरा उदय प्रताप सिंह, तिसरा उदयनाथ सिंह, चौथा उमर उर्फ श्याम प्रताप सिंह, पाचवा श्रीनाथ सिंह आणि सहावा क्रमांक दिवंगत ध्रुव प्रताप सिंह होता. सर्व भावांमध्ये जवळपास 75 बिघे जमीन आहे, ज्याची वाटणी झालेली नाही. हे कोणीच भाऊ गावात राहत नाहीत. या गावात त्यांचे चुलत भाऊच वास्तव्याला आहेत.

4) उमर गौतम याचं एक संशयास्पद ट्विटर अकाउंटही आढळलं आहे, ज्यात त्यानं स्वत:ला दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचा पुतण्या संबोधलं आहे. तसंच 20 वर्षांपूर्वी इस्लामचा (ISLAM) स्वीकार केल्याचंही म्हटलं आहे.

हे ही वाचा:मेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर?

5) एका दहशतवाद्याला शिक्षा झाली तेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अश्रू ढाळत होते. धर्मांतर विरोधी कायद्यालाही कॉंग्रेस आणि अन्य पक्ष विरोध करत होते. त्याचं कारण आता उघड झालं आहे. आम आदमी पक्षाचे लोक ज्यांचा उदोउदो करत आहेत, तेच लोक देशाचं विभाजन करणार आहेत, अशी टीका उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री मोहसीन रझा यांनी केली आहे.

6) केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही सक्तीनं धर्मांतर कोणत्याही परिस्थितीत मान्य केलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याला कायदयाची परवानगी नाही, त्यामुळं ज्या शक्ती असं बेकायदेशीर काम करत आहेत, त्यांना कायद्यानं जी शिक्षा असेल ती भोगावी लागेलचं.

7) देशाचं इस्लामीकरण करू पाहणार्‍यांच्या योजना कधीच यशस्वी होणार नाहीत, असं मत आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी व्यक्त केलं आहे. धर्मांतरासाठी परदेशातून येणाऱ्या निधीची चौकशी व्हावी, तसंच धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्या दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुस्लिम धर्मगुरूंनीही याबाबत आपलं मौन सोडून याला विरोध व्यक्त करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

8) ओखला इथले आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी भाजप  देशातील अल्पसंख्यांक आणि दलितांवर अत्याचार करत असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेश एटीएसनं उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांना अटक करून भाजप सरकारनं घटनात्मक अधिकारांवर हल्ला केला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. घटनेतील कलम 25 आणि 21  प्रत्येकाला आपल्या धर्माच्या प्रसारासह धर्माचे पालन करण्याचा अधिकार देतात. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून आपली बुडणारी बोट वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सरकारनं कायद्याचा आणि घटनेचा दुरुपयोग करणं थांबवावं आणि बेकायदेशीररीत्या अटक केलेल्यांना ताबडतोब मुक्त करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती

9) नोएडाचे अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितलं की, लखनऊ एटीएसनं बराच काळ धर्मांतरांशी संबंध असलेल्या दोन लोकांना अटक केली आहे. नोएडा सेक्टर -117 मधील नोएडा डेफ सोसायटीच्या एका केंद्रावर काही लोक जबरदस्तीनं धर्मांतर करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. इथं प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलांचं धर्मांतर करण्यात आल्याच्या दोन-तीन तक्रारी आल्या असून, त्याचा तपास सुरू आहे. या केंद्राविरूद्ध नोएडा पोलिसांकडं कोणतीही तक्रार आलेली नाही.

10) एटीएसनं कानपूर इथल्या मूकबधिर शाळेत शिकणाऱ्या आदित्य गुप्ता या विद्यार्थ्याच्या पालकांकडंही चौकशी केली. आदित्य नोएडाच्या सेक्टर 117 मधील शाळेत शिकत होता. कानपूर नगरच्या कल्याणपूर पोलिस ठाण्यात त्याच्या आई-वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. आपल्या मुलाचं धर्मांतर करून त्याला दक्षिणेकडील एका राज्यात नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मूकबधिर मुलानं मोबाइलवर केलेल्या व्हिडिओ कॉलद्वारे ही माहिती दिली. त्याच ठिकाणी शिकत असलेल्या आणखी एक मूकबधिर विद्यार्थी मन्नू यादव याचंही धर्मांतर करण्यात आल्याचं आढळलं आहे

First published:

Tags: Pakistan, Religion, Yogi Aadityanath