विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं विचारले होते 'हे' प्रश्न आणि दिला होता 'असा' त्रास

पाकिस्तानला धडा शिकवणारे भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान सैन्यानं कशी चौकशी केली हे समोर आलंय.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 04:36 PM IST

विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं विचारले होते 'हे' प्रश्न आणि दिला होता 'असा' त्रास

पाकिस्तानला धडा शिकवणारे भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान सैन्यानं कशी चौकशी केली हे समोर आलंय. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार पाकिस्ताननं अभिनंदन यांच्याकडे भारतीय वायुसेनेची संवेदनशील माहिती विचारली.

या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैनिकांनी अभिनंदन यांच्याकडून भारतीय सैन्याची व्यवस्था, उच्च सुरक्षेच्या रेडिओ फ्रीक्वन्सी, लाॅजिस्टिकबद्दलची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला.

अभिनंदनच्या टीममधल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की अभिनंदन यांना खूप मारझोड केली. त्यांना झोपायला दिलं नाही.

Loading...

त्यांना बराच काळ उभं ठेवलं. बसायला दिलं नाही. त्यांच्या समोर प्रचंड मोठ्या आवाजात संगीत लावलं.

अभिनंदन यांच्याकडून IAFचे ट्रान्झिट मेसेज, फायटर जेट्स आणि लाॅजिस्टिक व्यवस्था याची माहिती खोदून खोदून विचारली.

अभिनंदन यांच्या टीममधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही फायटर पायलट्सना गप्प बसण्याचं ट्रेनिंग देतो. म्हणजे पुढच्या 24 तासात अनेक योजना वायुसेना बदलू शकते. म्हणजे शत्रूनं माहिती काढली तरी उपयोग होत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...