News18 Lokmat

पाकिस्तानी महिलेनं विमानात टॉयलेट समजून उघडलं Emergency Exitचं दार

गोंधळलेल्या महिलेने Emergency Exitचं बटन दाबल्याने एकच गोंधळ उडाला आणि मोठा अनर्थ थोडक्यात टळला.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 06:34 PM IST

पाकिस्तानी महिलेनं विमानात टॉयलेट समजून उघडलं Emergency Exitचं दार

इस्लामाबाद 9 जून : पाकिस्तानी महिलेच्या एका चुकीमुळे शनिवारी मोठं संकट ओढवलं. पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स (PIA) च्या एका विमानात महिलेनं टॉयलेटचं दार समजून संकटकाळी बाहेर पडण्यासाठी जो दरवाजा असतो त्याचचं बटण दाबलं. त्यामुळे अचानक तो दरवाजा उघडला गेला. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच ही घटना घडल्याने विमानला तब्बल सात तास विलंब झाला.

जर्मनीतल्या मँचेष्टर विमानतळावर शनिवारी ही घटना घडली. PIAचं विमान कराचीसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होतं. त्याचवेळी ही महिला टॉयलेटला जाण्यासाठी विमानाच्या मागच्या बाजूला गेली होती. नेमकं कुठला दरवाजा आहे हे तिच्या लक्षात आलं नाही. त्या गोंधळात तिने Emergency Exitचं बटन दाबलं. त्यामुळे ते दार उघडलं आणि शिडीही बाहेर पडली.

या अचानक झालेल्या घटनेनं सगळेच गोंधळून गेले. नंतर त्या महिलेने जेव्हा माझाकडून चुकून बटन दाबलं गेलं असं सांगितलं तेव्हा सगळ्यांच्या लक्षात नेमकं कारण आलं. यामुळे तातडीने विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं आणि विमान बाजूला लावण्यात आलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानात जागा उपलब्ध करून देण्यात आली. या घटनेचे चौकशी करण्याचे आदेश PIAचे मुख्य कार्यकारी अधिकारी एयर मार्शल अरशद मलिक यांनी दिले आहेत.

या घटनेमुळे या विमानाच्या उड्डाणाला तबब्ल सात तास विलंब झाला. तर कंपनीला सर्व प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागली. पाकिस्तानच्या इतर सरकारी कंपन्यांप्रमाणेच ही कंपनीची प्रचंड तोट्यात आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या PIA ला अनेक अडचणींना सामेरो जावे लागतेय. आधुनिकीकरणासाठी पुरेसे पैसे नसल्याने अनेक तडजोडी कराव्या लागत असल्याचंही बोललं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...