पाकने पुन्हा केला LoC वर गोळीबार : गावकरी महिलेचा मृत्यू, गावं केली रिकामी

पाकने पुन्हा केला LoC वर गोळीबार : गावकरी महिलेचा मृत्यू, गावं केली रिकामी

पाकिस्तानने आपली युद्धखोरीची भूमिका अद्याप बदललेली नाही. आता पूंछ जिल्ह्यात कसबा आणि किरनी सेक्टरमध्येही फायरिंग झाल्याची बातमी आहे. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून : पाकिस्तानने आपली युद्धखोरीची भूमिका अद्याप बदललेली नाही. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. राजौरी सेक्टरमध्ये सकाळी तुफान गोळीबार केल्यानंतर आता पूंछ जिल्ह्यात कसबा आणि किरनी सेक्टरमध्येही फायरिंग झाल्याची बातमी आहे. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे आता सीमेजवळची गावं रिकामी करण्याय येत आहे. शेकडो नागरिकांना त्यांची घरं, गावं सोडून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

भारतीय हद्दीत सीमेपलीकडून तोफगोळे डागले जात होते. गोळीबारही सुरू होता. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पण या पाकिस्तानच्या गोळीबारात उरीमध्ये एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

पाक लष्कराने भारतीय हद्दीतल्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं. त्याला भारताने चोख उत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात राजौरीच्या नौशेरा येथे एक पोलीस जखमी झाले होते. सम्हानी सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा - पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

पाकिस्तानला धडकी भरवणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांनी केलेल्या कारवाई पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या वर्षीही जवानांनी मोठी कारवाई करत दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केलं होतं त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार करण्यात आले होते. मागच्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सातत्यानं सुरू आहेतच.

संकलन - अरुंधती

अन्य बातम्या

महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी बातमी, कोरोनाची नवी आकडेवारी समोर

VIDEO: औरंगाबादमध्ये उद्योग मंत्र्यांच्या गाडीसमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 भारतीय नागरिक जखमी

First published: June 12, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading