कुपवाडा, 28 जुलै : पाकिस्तानी सैन्याकडून सीमेजवळील भागात कुरापती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्ताकडून UCV (Unprovoked Ceasefire Violation) पद्धतीने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आज दुपारी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू-काश्मिरमधील कुपवाड्याच्या मच्चल आणि गुलाधार या भागात हा प्रकार घडला आहे. यावेळी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यापुढे भारतीयांनीही त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्यातील चिनार कॉर्पने याबाबत माहिती दिली आहे.
Pakistan initiated an Unprovoked Ceasefire Violation today along the LoC in Macchal & Gugaldhar Sector, Kupwara (J&K) in the afternoon hours by firing mortars and other weapons. Befitting response ensued: Chinar Corps, Indian Army
सध्या देशभरात कोरोनाचं संकट असतानाही पाकिस्तानच्या कुरापती सुरू असल्याचं दिसून येत आहे. भारत-चीन आणि भारत-पाकिस्तानमधील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने फ्रान्सकडून 5 राफेल विमान मागवले आहेत. 29 जुलैपर्यत ही विमान भारतात येण्याची शक्यता आहे. या विमानांमुळे भारताची शक्ती अधिक बळकट होईल आणि शत्रूला योग्य ते प्रत्युत्तर देता येणार असल्याने सर्वच भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.