इस्लामाबाद 3 मार्च : तिजोरीत खडखडाट असताना भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला महागात पडलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला असून महागाई 8.2 टक्क्यांवर पोहोचली असून गेल्या काही वर्षातला तो विक्रम आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमकपणे जी कारवाई केली आणि निर्णय घेतले त्यामुळे पाकिस्तानला झटका बसलाय. पाकिस्तानी रुपयांची किंमत घसरली असून स्टाक मार्केटही गडगडले आहे. गेल्या चार वर्षात महागाई वाढली नव्हती एवढी महागाई वाढली असून नागरिकांना त्याची झळ बसत आहे.
पाकिस्तानची निर्यात अगदीच थोडी असून सर्व गरजा आयातीवरच भागविल्या जातात. पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टॅटेस्टिक्सनुसार (PBS) जानेवारीत महागाईचा दर 7.19 एवढा होता तो आता 8.2 वर गेलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. भारतातून आयात करणं पाकिस्तानला सर्वाधिक स्वस्त पडतं मात्र हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा काढून टाकला आहे. तर आयातीवर 200 टक्के कर लावला आहे.
घसरता रुपया सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने अनेक निर्णय घेतले आहेत. व्याज दरातही 4.5 टक्के एवढी वाढ केलीय. पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा काढल्यानंतर भारत आणखी एक दणका देण्याच्या विचारात असून साउद एशियन फ्री ट्रेड एरिया म्हणजेच साफ्टातूनही पाकिस्तानला बाहेर काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
पाकिस्तानचे पाणीही रोखलं
पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला एक-एक झटका द्यायला सुरूवात केली आहे. यापूर्वीच भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले. या दोन धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर आता पाकिस्तानला आता तिसरा धक्का दिला आहे.
मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.