भारताविरोधात मोठा कट रचतोय पाकिस्तान, LoCवर तैनात केले कमांडो - सूत्र

भारताविरोधात मोठा कट रचतोय पाकिस्तान, LoCवर तैनात केले कमांडो - सूत्र

पाकिस्तान भारताविरोधात पुन्हा मोठं षड़यंत्र रचण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,22ऑक्टोबर : सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. पाकिस्तान भारताविरोधात पुन्हा मोठं षड़यंत्र रचण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. News 18ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं नियंत्रण रेषेच्या दिशेनं कित्येक टँक रवाना केले आहेत. सोबतच आपल्या स्पेशल फोर्समधील 100 कमांडो देखील तेथे तैनात केले आहेत. या हालचालींवरून पाकिस्तान भारताविरोधात पुन्हा मोठा कटकारस्थान रचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या कोणत्या प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

(वाचा : रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू!)

बिथरलेला पाकिस्तान

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानकडून सातत्यानं घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरच्या तंगधार आणि केरन सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या हल्ल्यास भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये कठोर कारवाई करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

(वाचा :EVMचं बटण कुठलंही दाबा, मत कमळालाच; 'या' मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार)

या कारवाईत भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात पाकिस्तानचे 10 सैनिकदेखील ठार झाले तसंच कित्येक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याबाबतची माहिती पाकिस्तानकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

(वाचा : पाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी!)

भारतीय जवानांनी आर्टिलरी गनने 35 दहशतवाद्यांचा काढला काटा

दरम्यान, रविवारी (20 ऑक्टोबर)सकाळी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलं. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. तसेच पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले असून 25 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. भारताने याआधीही सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

First published: October 22, 2019, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading