पाकिस्तानने म्हणे ही दुर्बीण पाठवली अवकाशात ! मंत्र्यांचा अजब दावा

पाकिस्तानने म्हणे ही दुर्बीण पाठवली अवकाशात ! मंत्र्यांचा अजब दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जपान आणि जर्मनी हे शेजारी देश असल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानचे विज्ञान - तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानने अवकाशात हबल दुर्बीण पाठवल्याचा जावईशोध लावला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 6 मे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जपान आणि जर्मनी हे शेजारी देश असल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानचे विज्ञान - तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानने अवकाशात हबल दुर्बीण पाठवल्याचा जावईशोध लावला आहे.

मग 'नासा' काय करत होतं ?

पाकिस्तानच्या अवकाश संशोधन संस्थेने हा 'चमत्कार' केला, असं फवाद चौधरी यांनी एका टीव्ही शो मध्ये सांगितलं. जगातली ही सगळ्यात मोठी दुर्बीण आम्ही अवकाशात सोडली आहे, असं ते चक्क म्हणाले.

ही दुर्बीण आम्ही उपग्रहामार्फत अवकाशात सोडली इतका हास्यास्पद तपशील सांगायलाही ते विसरले नाहीत. खरं पाहिलं तर हबल ही दुर्बीण 1990 मध्येच पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आली आहे. जगातली ही सगळ्यात मोठी दुर्बीण आहे आणि ही दुर्बीण नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने अवकाशात सोडली आहे.

'नासा'चे प्रमुख काय म्हणतील?

त्यामुळेच फवाद चौधरी यांचा हा दावा ऐकून आता 'नासा'चे प्रमुख राजीनामा देतील आणि फवाद चौधरी यांच्या पक्षात जातील, अशी उपहासात्मक टीका त्यांच्यावर होते आहे.

फवाद चौधरी यांनी जिओ न्यूजच्या एका टॉक शो मध्ये हा दावा केला आणि या लाँचिंगबद्दल सुपॅर्को या पाकिस्तानी अवकाश संशोधन संस्थेला श्रेयही घेऊन टाकलं.

एवढं बोलूनही ते थांबले नाहीत तर पाकस्तानने उपग्रह आणि अवकाश संशोधनाच्या तंत्रांमध्ये कशी प्रगती केली आहे याबदद्ल ते बतावणी करत राहिले.

सोशल मीडियावर झाले ट्रोल

फवाद चौधरी यांच्या या अजब दाव्यांनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होते आहे. इम्रान खान यांनी आता असा शोध लावणाऱ्यांनाच अवकाशात पाठवावं, अशी एक शेलकी प्रतिक्रिया ट्विटरवर आली आहे.

सगळ्यात मजा म्हणजे याच फवाद चौधरींनी याआधी नोव्हेंबरमध्ये अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं. काही राजकीय नेते गोंधळ निर्माण करत आहेत आणि त्यांना अवकाशात धाडलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. एकदा हे सगळे जण अवकाशात गेले की परत येणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनीच केली होती.

===============================================================================

VIDEO :3 लाखांच्या पैठण्यांवर चोरांचा डल्ला, सीसीटीव्हीसमोर केला डान्स

Tags: pakistan
First Published: May 6, 2019 06:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading